सोनई पोलिसांची धडाकेबाज कारवाई . नगर औरंगाबाद हायवे वर गजाने भरलेला ट्रक लुटणारी टोळी सोनई पोलिसांकडून जेरबंद.
प्रतिनिधी संभाजी शिंदे .खेडले परमानंद तालुका नेवासा
दिनांक 10 जून 2000 22 रोजी रात्री एक ते सकाळी सहाच्या दरम्यान जालना येथून MH12 AP 3295 हा21850 किलो वजनाच्या लोखंडी सगळ्या म्हणजेच गज घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला घोडेगाव शिवारात दोन दोन दुचाकीस्वारांनी गाडी आडवी लावून चालकाला चाकूचा धाक दाखवून त्यास बळजबरी घेऊन जाऊन 5 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल चालकाचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून हा ट्रक भोजपुरी तालुका पाथर्डी शिवारात रस्त्याच्या कडेला सोडून निघून गेले होते. त्यानंतर सदर ट्रक ड्रायव्हर निसार गुलाम शेख राहणार आश्रब नगर पुणे यांनी सोनई पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार सोनई पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 191 / 2022 भादवि कलम 392, 363, 141, 34, 412 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व सोनई पोलीस स्टेशनचा स्टॉप यांनी पाथर्डी व पाथर्डी परिसरात शोध घेतला असता गुप्त बातमी दाराकडून सोनई पोलीस प्रशासनाला पक्की खबर मिळाली की आरोपी
1)सुजित राजेंद्र चौधरी. वय 32
राहणार निपाणी वडगाव तालुका पाथर्डी,
2) संकेत बद्रीनाथ बडे, वय 20.
मूळ राहणार जेऊर हैबती तालुका नेवासा, हल्ली राहणार आगसखांड तालुका पाथर्डी.
3) रोहन संजय चव्हाण, वय 21
राहणार शिक्षक कॉलनी पाथर्डी.
4) दत्तात्रय गोरक्ष साळुंके वय 33
राहणार निवडूंगे तालुका पाथर्डी. यांनी आणि इतर दोन ते तीन साथीदारांनी मिळून ही चोरी केली आहे.
चोरलेल्या स्टील बाबत पोलिसांनी आरोपी यांच्याकडे
सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरलेले स्टील
शंकर आसाराम घोडके रा. निवडूंगे यास विकले असल्याची कबुली दिली आहे त्यानुसार सोनई पोलिसांनी घोडके यास अटक करून त्याच्याकडून 6860 किलो वजनाचे 4 लाख 80200 रुपयाचे स्टील हस्तगत केले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलिस ठाण्याचे स.पो.नि माणिक चौधरी, पो.स.ई उमेश पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पो.हे.कॉ मच्छिंद्र आडकित्ते, दत्ता गावडे ,पो.ना. बाळासाहेब बाचकर , नानासाहेब तुपे, विठ्ठल थोरात, सचिन ठोंबरे, रवी गर्जे, अमोल जवरे, यांनी ही कामगिरी केली आहे.
सदर आरोपी हे सराईत चोरी करणारे असून या गुन्ह्यातील आरोपीवर यापूर्वी औरंगाबाद -अहमदनगर मार्गावर सोनई पोलिस ठाण्यात कलम 392, 34, या प्रमाणे हत्यारांचा धाक दाखवून लुट केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
सोनई पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.