घरकुल योजनेसाठी वापरण्यात आलेल्या मुरूम,वाळू,अवैध वाहतुक ता.पाथर्डी चे नायब तहसिलदारांसाठी तलाठी धरम A.C.B.च्या जाळ्यात.

घरकुल योजनेसाठी वापरण्यात आलेल्या मुरूम,वाळू,अवैध वाहतुक ता.पाथर्डी चे नायब तहसिलदारांसाठी तलाठी धरम A.C.B.च्या जाळ्यात.

यातील तक्रारदार यांनी दि.३१/०७/२०२५ रोजी A.C.B. कार्यालय अहिल्यानगर येथे तक्रार दिली तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजुर झाले आहे.

सदर घरकुलाच्या पाया भरण्यासाठीच्या कामकाजा करीता मुरूम व जाडसर वाळूच्या दोन गाड्या तक्रारदार यांनी नदीपात्रातून आणून घरकुलाचे बांधकामाच्या ठिकाणी खाली केल्या होत्या,

सदर मुरूम आणने करीता त्यांनी त्यांचे चुलते व मित्र यांचे जेसीबी व ट्रॅक्टरचा वापर केला होता,

यातील आरोपी लोक सेवक तलाठी धरम व नायब तहसिलदार सानप तहसिल कार्यालय पाथर्डी यांनी रात्रीच्या वेळी त्या ठीकाणी येवून पाहणी केली त्यानंतर आरोपी लोक सेवक तलाठी सतिष धरम हे तक्रारदारास म्हणाले कि तुम्ही गौन खनिजाची अवैध वाहतुक केली आहे तुमच्या वाहनांवर व तुमच्यावर कार्यवाही होवू द्यायची नसेल तर नायब तहसिलदार सानप यांना ५०.००० हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून आरोपी लोक सेवक तलाठी धरम याने तक्रारदार यांच्या वाहनांवर व मुरुमाच्या ढीगावर अवैध गोनखनिज वाहतुकीचे कारवाई न करणे च्या मोबदल्यात ५०,००० रुपये लाचेची मागणी केली

सदरची लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून आरोपी लोक सेवक तलाठी धरम यांनी स्वःत स्वीकारून ती लाच रक्कम खाजगी इसम घोरपडे यांचेकडे दिली आहे

आरोपी लोक सेवक धरम यांना ताब्यात घेण्यात आले असून पाथर्डी पोलिस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे,

        *सक्षम अधिकारी*

माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर

    *सापळा व तपास अधिकारी*

          मा. अजित त्रिपुटे

पोलीस उपअधिक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर

      *मो-8329701244*

          *सापळा पथक*

पोलीस कॉन्स्टेबल रवी निमसे, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हारून शेख,सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर

            *मार्गदर्शक*

*मा.भारत तांगडे पोलीस अधिक्षक,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक मो.8888832146*

*मा.माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नाशिक मो.*

     *9922266048*

*आरोपी लोकसेवक यांचे सक्षम अधिकारी मा.जिल्हाधिकारी अहिल्यानगर*

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देणेसाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी क्रप्शन ब्युरो,अहिल्यानगर तहसिल कार्यालय सावेडी अहिल्यानगर.

*दुरध्वनी क्र - ०२४१ -२४२३६७७*

      *मो. ८३२९७०१३४४*

      *टोल फ्रि क्र.१०६४*