विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मित्रमंडळ डिग्रस येथे १३१ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मित्रमंडळ डिग्रस येथे १३१ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .

राहुरी तालुक्यातील डिग्रस गाव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंति निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .यामध्ये प्रमुख मार्गदर्शक डिग्रस गावचे मा. सरपंच रावसाहेब पवार हे होते .यावेळी डिग्रस गावातील अनेक तरुणांनी या रक्तदान शिबिराचा लाभ घेऊन रक्त दान केले आहे .यामध्ये निलेश पवार ,निलेश , विशाल पवार, राहुल घोरपडे, सुरज पवार, संदीप गावडे ,रवि बर्डे ,पवण पवार , विकि जाधव,तसेच गावातील अनेक तरुणांनी या रक्तदान शिबिरामध्ये आपले रक्तदान करून भविष्यामध्ये कोणत्याही गोरगरीब जनतेस याची गरज भासल्यास ते त्वरीत उपलब्ध करून देण्यात येईल असे श्री रावसाहेब पवार यांनी सांगितले.

तसेच यावेळी ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे, संदिप ओहोळ ,अनिल शिन्दे , कार्यकर्ते संजय पवार , बापूसाहेब मोरे 'आरूण पवार ,तान्हाजी पवार ,राजू कसबे ,रुपेश साबळे ,आनिस सय्यद , पत्रकार राजु पवार ,रोटरी क्लबचे डॉक्टरर्स व नर्स यावेळी उपस्थीत होते . डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतिनिमित्त समाजामध्ये माणूसकी कायम जिवंत रहावी व माणूस माणसाच्या कामी आला पाहीजे असे विचारधारा निर्माण करणारे कर्म सतत जनतेमध्ये निर्माण व्हावे यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .

सध्याच्या तरुण वर्ग हा दुष्कर्मा पासून परावृत्त होऊन सत्कर्माकडे वळला पाहीजे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ व्या जयंती निमित्त बाबसाहेबांना याद्वारे विनम्र अभिवादन .