चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलला नॅशनल आयकॉन अवॉर्ड पुरस्कार प्रदान.
चाईल्ड करिअर स्कूलला नॅशनल आयकॉन अवॉर्ड
बालाजी देडगाव:- (प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून लौकिक असलेली चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सलाबतपूर या उपक्रमशील शाळेस या वर्षीचा मुंबईच्या मुलुंड येथील रंगोत्सव या संस्थेचा नॅशनल आयकॉन पुरस्कार मिळाला असल्याची माहिती स्कूल चे प्राचार्य संदीप खाटीक यांनी दिली.
रंगोत्सव हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेत या शाळेने सलग पाचव्या वर्षी सुवर्ण पदक मिळविलेले आहे.एकाच स्पर्धेत,एकाच शाळेचे,सलग पाचव्या वर्षी अनेक विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत.तसेच शाळा विद्यार्थ्यांना देत असलेले प्रशिक्षण व प्रोत्साहन विशेष आहे.तसेच शाळा राबवत असलेले विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम यांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला असल्याची माहिती रंगोत्सव चे प्रमुख श्री. संग्राम दाते यांनी दिली.
चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले.