बनावट लग्न लावून देणारी टोळी लोणी पोलीस स्टेशनकडून जेरबंद .

बनावट लग्न लावुन देणारी टोळी लोणी पोलीस स्टेशन कडुन जेरबंद . लोणी पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई .
दि.30/11/2023 रोजी पुर्वी एक महीना ते दि. 23/12/2023 रोजी स. 11/00 वा. चे दरम्यान भगवतीपुर ता. राहता येथे आरोपी महीला 1)नामे रेश्मा उर्फ दिव्या रमेश चव्हाण 2 ) रोहिणी कैलास गायकवाड 3) दिपीका प्रविण कांबळे सर्व रा. बदलापुर बेलवली ता. अमरनाथ जि.ठाणे 4) पुंडलिक चांगदेव शिंदे उर्फ सतिष बाबासाहेब शिंदे रा. तिळवणी ता.कोपरगाव 5) अनिता संतोष चंदनशिवे 6) संतोष फकिरा चंदनशिवे 7 ) राममल राठोड 8 ) संगिता घुले सर्व रा. छत्रपती संभाजीनगर यांनी संगणमत करुन यातील फिर्यादीचा मुलगा मयुर दशरथ गायकवाड यांचे लग्न करण्यासाठी मुलगी दाखवितो असे म्हणुन मध्यस्थ आरोपी पुंडलीक चांगदेव शिंदे उर्फ सतिश बाबासाहेब शिंदे यांनी आरोपी दिपीका प्रविण कांबळे हीचे लग्न झालेले असतांना ती नवरी आहे असे भासवुन फिर्यादी दशरथ शंकर गायकवाड यांचे कडुन लग्न लावण्यासाठी रुपये 3,20,000 / रुपये घेतले व फिर्यादीचे सदर गुन्हयांतील फिर्यादी दशरथ शंकर गायकवाड वय 53 वर्ष रा.भगवतीपुर ता.राहता यांचे मुलांशी लग्न लावुन देवुन त्यांची फसवणुक केली आहे.
सदर बाबत यातील फिर्यादी दशरथ शंकर गायकवाड रा. भगवतीपुर ता. राहता यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन लोणी पोलीस स्टेशन /-776/2023 भा.द. वि.कलम 420,418,406,417,120 (ब), 34 प्रमाणे दि. 23/12/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .
सदर गुन्हयांचे तपास अनुसंघाने सपोनि युवराज आठरे, पोसई योगेश शिंदे, पोसई आशिष चैधरी, पोहेका / दिनकर चव्हाण,पोना /रविंद मेढे, पोना गणेश आंडागळे, पो. कॉ. मच्छिंद्र इंगळे, मपोका / जयश्री सातपुते, मपोका / मनिषा गिरी लोणी पो, स्टे. येथील पोलीस तपास पथक यांनी सदर गुन्हयाचा तपास करता मिळालेल्या गुप्त बातमीदार सदर आरोपी यांना ताब्यात घेवुन तपास पथकांनी ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता आरोपी पुडलीक चांगदेव शिंदे उर्फ सतिश बाबासाहेब शिंदे यांनी लग्न लावण्यासाठी मध्यस्थ केली होती त्या बदल्यात एकुण 26000 /-रुपये घेतले ते सदर गुन्हयांत जप्त केले आहे सदर गुन्ह्यांतील आरोपी महीला नाम 1 ) रेश्मा उर्फ दिव्या रमेश चव्हाण 2) रोहिणी कैलास गायकवाड 3 ) दिपीका प्रविण कांबळे सर्व रा. बदलापुर बेलवली ता. अमरनाथ जि.ठाणे 4) पुंडलिक चांगदेव शिंदे उर्फ सतिष बाबासाहेब शिंदे रा. तिळवणी ता. कोपरगाव यांना जेरबंद केले आहे. व दि.30/12/2023 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल आहे.आरोपी नं. 4 सतिष बाबासाहेब शिंदे रा. तिळवणी ता. कोपरगाव जि. अहमदनगर यास जेरबंद करण्यात आले आहे .
सदरची कारवाई ही राकेश ओला , पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर , अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर संदिप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांचे सुचना व मार्गदर्शना खाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोसई योगेश शिंदे, पोसई आशिष चैधरी, पोहेका / दिनकर चव्हाण, पोना / रविंद मेढे,, पो. कॉ. मच्छिंद्र इंगळे ,पोना गणेश आंडागळे, मपोका /जयश्री सातपुते, मपोका / मनिषा गिरी या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.