लक्ष्मीमाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त मूर्तीची मिरवणूक गजढोल ,गजनृत्य व पोतराजाची भक्ती यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न.
बालाजी देडगाव:- ( प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे लक्ष्मी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त या मूर्तीची गावभर मिरवणूक थाटामाटात व उत्साहात पार पडली.
यावेळी लक्ष्मीचे भक्त पोतराज यांनी आपला भक्तीचा खेळ सादर केला व देवीच्या नावाने तडाके मारून घेतले या मिरवणुकीचे पोतराज आकर्षक ठरले.
या मिरवणुकीमध्ये धनगर समाजातील पारंपारिक खेळ गजनृत्य व गज ढोल यामध्ये मोठ्या आनंदाने हा खेळ साजरा करण्यात आला. फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व महिलांच्या डोक्यावरील कलश याने मिरवणूक उल्हासमय झाली होती .मोठ्या थाटामाटात व आनंदात ही मिरवणूक उत्साहात पार पडली.
उद्या सकाळी9 ते 1 यादरम्यान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ब्राह्मणांच्या उच्चारातून पडणाऱ्या वेद मंत्रातून व महंत लक्ष्मण महाराज कराड यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. अशी माहिती नारायणराव खरात व हरीभाऊ खरात यांनी दिली व सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती केली.
या मिरवणुकीमध्येे सर्व जाती-धर्माच्या्या लोकांनी सहभाग घेऊन एकात्मतेचेे प्रतीक
दाखवले.