कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेले गोवंश जातीचे जनावरे महालक्ष्मी हिवरे येथुन जप्त.सोनई पोलीसांची कामगिरी..
खेडले परमानंद प्रतिनिधी दि16
सध्या सोनई पोलिसांकडून अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम सुरू आहे. दि. १५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता महालक्ष्मी हिवरे येथील वसंत डॅनियल गाडे रा. महालक्ष्मी हिवरे यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस वेगवेगळ्या प्रकारच्या गोवंश जातीचे जनावरे कत्तली साठी डांबून ठेवले असल्याची खबर मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पो.स.इ .राजेंद्र थोरात,पो. हे. काॅ. दत्ता गावडे, स.फौ.काकासाहेब राख यांनी तातडीने त्या ठिकाणी अवैधरित्या डांबून ठेवलेले एकुण सतरा जनावरांसह चार वासरे असे एकूण दोन लाख बावीस हजार किमतीची गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेवून त्यांना पाथर्डी तालुक्यातील मढी येथील गेले दहा वर्षांपासून सुरू असलेल्या दिपक महाराज काळे यांच्या गोशाळेत सुरक्षित रित्या सोडून दिले.
डॉ. आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडी रा. तांदुळनेर ता. राहुरी प्राणी कल्याण अधिकारी मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसंत डॅनियल गाडे रा. महालक्ष्मी हिवरे याचे विरुद्ध महा प्राणी संरक्षण अधि १९९५ चे कलम ५,५(ब),९सह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधि १९६० चे कलम ३,११(१)( च ) (ज) (झ) प्रमाणे सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. फौ. काकासाहेब राख हे करत आहे.