कै .गोरक्षनाथ सावळेराम पवार यांचे प्रथम पुण्यस्मरण ह .भ. प . मनोहर महाराज सिनारे यांच्या सुश्राव्य किर्तनाने संपन्न .
राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे कै .गोरक्षनाथ सावळेराम पवार यांचे प्रथम पुण्यस्मरण ह .भ. प . मनोहर महाराज सिनारे यांच्या सुश्राव्य अशा किर्तनाने संपन्न झाले . गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाने गोरक्षनाथ पवार यांचे निधन झाले होते .आज त्यांचे प्रथम पुण्यस्मरण असल्याने नातेवाईक ,मित्रमंडळी ,महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अधिकारी, पदाधिकारी ,कर्मचारी ,पिंप्री अवघड गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कै . गोरक्षनाथ सावळेराम पवार हे गावातच नव्हे तर पंचक्रोशीतही एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते .गरिबांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना योग्य ती मदत करण्याचे काम ते करत होते .गावातील प्रत्येक उत्साहात ते हरीरीने सहभाग घेत असत .
गावामध्ये जर कोणाचे दुःखद निधन झाले तर त्या कुटुंबीयांना आधार देऊन गेलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीची तयारी ते स्वतः करत असत .अशा या कर्तुत्ववान व्यक्तीच्या जाण्याने गावामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे .ह .भ .प .मनोहर महाराज सिनारे यांनी गोरक्षनाथ पवार यांच्या कार्याचा आलेख उपस्थितां समोर मांडत असताना सर्वांचे डोळे पाणावलेले होते .
आपल्या वडिलांची आठवण सतत राहावी म्हणून कै .गोरक्षनाथ पवार यांच्या जालिंदर व शरद या दोन्ही मुलांनी पिंप्री अवघड स्मशानभूमीसाठी तेथील धार्मिक विधी व्यवस्थित व्हावे म्हणून भव्य असे पत्र्याचे शेड उभारून दान केले आहे .त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .