आज राहुरी न्यायालयात संविधान दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक शिबिर .

आज राहुरी न्यायालयात संविधान दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक शिबिर .

आज राहुरी न्यायालयात संविधान दिनाचे औचित्य साधून कायदेविषयक शिबिर उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सौ. असावरी वाडकर मॅडम या होत्या प्रमुख उपस्थितीत सह.न्यायाधीश सौ.पुनम बिडकर मॅडम,सरकारी वकील ॲड.रवींद्र गागरे,संभाजी वाघ, सहाय्यक सरकारी वकील सौ.सविता गांधले मॅडम या होत्या संविधाना बाबत माहिती ॲड.मनीषा पंडित यांनी सांगितले की,राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा आदर करून उद्देशिका सर्वांनी मुखोगत करावी आपल्या प्रमुख अध्यक्षीय भाषणात मुख्य न्यायाधीश यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून आपल्याला दिलेल्या हक्काबरोबरच जबाबदारीचे भान ठेऊन कर्तव्याचे पालन करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.मच्छिंद्र देशमुख यांनी केले कार्यक्रमास उपस्थित ॲड .नानासाहेब निमसे, ॲड.कारभारी ढोकणे,ॲड.प्रकाश संसारे,ॲड.संतोष साळुंखे,ॲड.बबन आघाव,ॲड.सुहास तोडमल,ॲड.कचेश्र्वर घाडगे,ॲड.स्वाती सांगळे,ॲड.अनिता तोडमल,ॲड.कल्याणी पागीरे,ॲड.पल्लवी कांबळे,ॲड.मनीषा आढाव,ॲड.ज्योती राऊत,ॲड.जयश्री घावटे,ॲड.शोभा रनवरे कार्यालयीन सर्व स्टाफ होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी लीगल विभागाचे विकास जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी उपस्थितांचे आभार वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड कारभारी ढोकणे यांनी मानले.