नगर मनमाड रस्ता मुळा नदीवरील राहुरी येथील फुल धोकादाय परिस्थितीत - देवेंद्र लांबे पा .

नगर मनमाड रस्ता मुळा नदीवरील राहुरी येथील फुल धोकादाय परिस्थितीत - देवेंद्र लांबे पा .

*नगर मनमाड रस्ता मुळा नदीवरील राहुरी येथिल पुल धोकादायक परीस्थित – देवेंद्र लांबे पा.* 

 

      *भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अभियंता यांनी केली पुलाची पाहणी*

 

                नगर मनमाड रस्त्याला जोडणारा राहुरी येथील मुळा नदीवरील पुल धोकादायक बनला असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख तथा रस्ता दुरुस्त कृती समितीचे देवेंद्र लांबे पा.यांनी म्हंटले आहे.सोमवार दि.२ जून रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्गाचे अभियंता अलोक सिंग यांना सोबत घेत पुलाची पाहणी केली.या प्रसंगी शिवसेना ता.संपर्क प्रमुख अशोक तनपुरे,सामाजिक कार्यकर्ते आदिक खैरे,महेंद्र शेळके उपस्थित होते.

            राहुरी येथील नगर मनमाड मुळा नदीवरील पुलावरून शिर्डी- शिंगणापूर तसेच परराज्यातील अनेक अवजड वाहनांची वाहतूक होत असते.महसूल प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे पुलाखालील वाळू अज्ञात वाळू माफियांनी चोरून नेल्यामुळे पुलाच्या पायाखाली मोठ्याप्रमाणावर खड्डे निर्माण झालेले आहे.पुलाच्या खाली वाळू उपशामुळे खड्डे निर्माण झाल्यामुळे मुळा नदीवरील पुल अखेरची घटका मोजतो आहे कि काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

             या प्रसंगी देवेंद्र लांबे म्हणाले कि गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून रस्ता दुरुस्त कृती समितीच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत.आंदोलनाच्या रेट्यामुळे महामार्गाचे काम चालू झाले आहे.परंतु रस्ता दुरुस्त होत असतांना नगर ते मनमाड या रहदारीचा मुख्य दुवा असलेला राहुरी येथिल मुळा नदीवरील पुला खालील वाळू अज्ञात वाळू तस्करांनी चोरून नेलेली आहे.भविष्यकाळात पुला खालील पायाभरणी व्यवस्थित न केल्यास हा पुल रहदारीसाठी धोकादायक बनू शकतो.या पुलाची धोकादायक परिस्थिती पाहणी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अभियंता अलोक सिंग यांना बोलविण्यात आले होते.त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे.मुळा नदीवरील पुला खालील वाळू उपशाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली जाणार असल्याचे शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा.यांनी म्हटले आहे.