श्री ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त मंडळ त्वरित बरखास्त करा - ताके

श्री ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त मंडळ त्वरित बरखास्त करा - ताके

प्रतिनिधी खेडले परमानंद ,नेवासा

श्री ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त मंडळ त्वरित बरखास्त करा - ताके

नेवासा - विश्वकल्याणाचे ' पसायदान ' मागणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या जन्मस्थळाची अवस्था आज केविलवाणी झाली असून यास केवळ येथील निष्क्रिय विश्वस्त मंडळ असून मंडळाच्या विरोधात नागरीकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी व संताप असून शासनाने याची गंभीरपणे दखल घेत चौकशी करुन संबंधितांवर  

योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी प्रातिनिधिक स्वरुपात नेवाशाचा एक सर्व सामान्य नागरिक म्हणून अशोक ताके यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित विभीगांचे अधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे

या बाबत पाठवलेल्या निवेदनात ताके यांनी म्हटले आहे की जगातील सर्व साहित्य कृती फिक्या पडतील आशा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सर्वात प्रथम कथन माऊलीनीं ज्या स्तंभाला टेकून केले व त्यानंतर तत्कालीन मंडळाने जगातील एकमेव असे खांबासाठी मंदिर उभारण्यात आले असा पवित्र पैस स्तंभ , व मंदिर विश्वशांतीचे ठिकाण म्हणून नेवाशाचे नांव जगाच्या नकाशावर उमटल्याने या तिर्थक्षेेत्राला आध्यात्मिक आणि साहित्यिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व आसल्याने लाखो भाविक व मराठी जनांचे श्रद्धास्थान बनले आहे. दर एकादशीला तालुक्यातील तसेच जिल्ह्य़ातून हजारो वारकऱ्यांच्या दिंड्या येत असतात वर्षांला दहा ते बारा लाखांहून अधिक भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात 

या ठिकाणाचे महत्त्व ओळखूून राज्य सरकारने या स्थळाचा विकास करण्यासाठी 1997 ला तीर्थक्षेत्राचा दर्जा देवून राज्यातील अती महत्त्वाचे तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करुन भरीव निधी दिला तसेच राज्यातील अनेक विधान परिषद सदस्य, विधान सभा सदस्य, राज्यसभा सदस्य शिर्डी संस्थान यांनी आपआपल्या निधीतून मोठे योगदान दिलेले आहे. विश्वस्त मंडळाला याचे काहीही देणे घेणे नसल्याचे निदर्शनास येत आहे कोट्यावधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या कामांत दर्जेदारपणा नाही वास्तविक कामे होत असतांना विश्वस्त मंडळाने काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे होते. विशेष गुणवत्ता तपासणी यंत्रणेकडून झालेल्या कामांची तपासणी झाल्यास मोठ्या प्रमाणात कामांचा दर्जा स्पष्ट होवू शकतो.

विश्वस्तांंत ताळमेळ नसल्याचे निदर्शनास येत आहे.

एका विश्वस्ताने तर मंदिर परिसरात मोठी दहशत निर्माण केली आहे. मंदिरात येणारे भाविक , अन्य कीर्तनकार यांना आपमानास्पद वागणुक दिली जाते.

अनेकांना धमकावन्याचे प्रकार घडत आहेत. यातून या विरोधात आवाज उठविणारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे . सदर विश्वस्ता विरोधात अन्यही गंभीर तक्रारी आहेत. दान पेटीत जमा होणारी एकूण रक्कम त्याचा विनियोग या बाबतची माहीती देणगीदार , भाविक, नागरीक यांचे माहितीसाठी वृत्त पत्रातून जाहीर प्रगटनाद्वारे प्रसिद्ध होणे अपेक्षित असताना तसे होताना दिसून येत नाही.   

मूळ घटना व दुरुस्त केलेली घटना यांत नागरीकांच्या मनात साशंकता आसल्याने मुळ घटनेपासून घटना अभ्यासने गरजेचे आहे. मंदिराचे वैभव वाढविण्यासाठी विश्वस्तांकडून प्रयत्न होताना दिसत नाही एखाद्या एकादशीला विश्वस्त येेतात व साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर थोडा वेळ थांबून अल्पोपाहार, चाहापणी घेवून निघून गेल्या प्रमाणे जातात.एकंदरीत विश्वस्त मंडळाच्या कार्यपध्ती विषयी भाविक नागरीकांत तीव्र नाराजी आहे.मोठे जन आंदोलन उभे राहाण्यापूर्वी शासनाने या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी ताके यांनी आपल्या निवेदनात केली आहे.