बालाजी देडगाव येथे महादेव मंदिराच्या सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न.
बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण ) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे माजी मंत्री आमदार शंकराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून आदर्श कोकरे वस्ती येथील महादेव मंदिर साठी 8 (आठ)लक्ष रुपयाचे सभामंडप देउन काम पूर्ण केले. त्यानिमित्ताने मा. सभापती सुनीताताई शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थित व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ह भ प सुधाकर महाराज वाघ श्री. क्षेत्र पैठण , शिवसेना नेते रामदास कोल्हार व शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के यांच्या शुभहस्ते नारळ फोडून या सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
यावेळी सुनीताताई गडाख म्हणाल्या की, या आदर्श कोकरे वस्ती येथे गरजेनुसार सभा मंडप दिला आहे. जनतेची सेवा करणे व सांगितलेली कामे पूर्ण करणे ही आमची कर्तव्य आहे व जास्तीत जास्त कामे आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून मार्गी लावून परिसरातील विकास साधण्याचा प्रयत्न करू . असे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित ह भ प सुखदेव महाराज मुंगसे,शिक्षणभूषण बाजीराव पाटील मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे, माजी उपसभापती कारभारी चेडे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी उपसरपंच हरिभाऊ कोकरे ,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, ह भ प राजाराम महाराज मुंगसे,
, सोसायटीचे उपाध्यक्ष भिवबाई गोयकर, गणेश भाऊ लोंढे व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.