भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जि.प.प्रा शाळा खेडले परमानंद व ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती खेडले परमानंद ता. नेवासा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान संतोष निमसे सर यांनी सादर केले. अतिशय खडतर जीवन प्रवास ,हालाकीचे दिवस काढून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली, ते उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. स्वतंत्र भारताचे संविधान लिहून ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले.
यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी वंदन केले.
या कार्यक्रमाला नितीन केदारी यांनी लहान मुलांना खाऊचे वाटप केले. जि प प्रा शाळेच्या मुख्याध्यापिका सविता आव्हाड मॅडम, सविता दरंदले शिक्षिका, व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
दादासाहेब तूवर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपल्या शब्द सुमनांनी वंदन केले. ग्रामपंचायत उपसरपंच प्रशांत तुवर, सदस्य रमेश बनकर, संदीप केदारी, त्याचप्रमाणे गावातील नागरिक दादासाहेब रोठे, कोंडीभाऊ तूवर,नयुम इनामदार, माऊली तुवर, संजय दुशिंग, प्रशांत केदारी, किशोर केदारी, बाळासाहेब दुशिंग, नानासाहेब गायकवाड, राहुल वैरागर, बाळा ब्राह्मणे, सुरेश केदारी, गणेश शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी तेजस बाळासाहेब दुशिंग या विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.