नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे राष्ट्रीय पल्स मोहीम योजना राबवण्यात आली.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे राष्ट्रीय पल्स मोहीम योजना राबवण्यात आली.

       

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाच वर्षांच्या आतील बालकांना पोलिओचा डोस देऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला!

    यावेळी सरपंच यांनी गावातली जमलेल्या नागरिकांना आवाहन केले की,0 ते 5 वर्षाखालील एकही लाभार्थी वंचित राहू नये . व हा पोलिओ डोस मुलांच्या हेतूचा आहे. जेणे करून गावात अपंग व्यक्ती तयार होऊ नये. व सर्व पालकांनी आपल्या मुलांना डोस देऊनच घ्यावे. यानंतर समुदाय आरोग्य विकास अधिकारी डॉ.अजित गवळी यांनी डोस विषयी पालकानी मनातील गैरसमज काढून टाकावे आशी सूचना केली व आरोग्यविषक माहिती दिली.

       यावेळी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके ,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे,ग्रा.सदस्य अशोक मुंगसे,बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, प्रगशिल बागायतदार बन्सी पाटील मुंगसे, ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष विश्वास हिवाळे, बंडू बनसोडे तसेच आरोग्य विभागाचे समुदाय आरोग्य विकास अधिकारी अजित गवळी, आरोग्य सेवक डॉ.प्रवीण चाऱ्हाटे, अशावर्कर ए. डी. सूर्यवंशी,अशा मिना कदम व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.