नेवासा तालुक्यातील बालाजी देडगावचा ढगफुटी सदृश्य पावसाने बाहेरील गावाशी संपर्क तुटला. व पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे परतीच्या पावसाने अतिशय धुमाकूळ घातला असून. ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असुन, शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तुर ,ऊस , कांद्याचे रोप व विविध पिकाचे मोठे जोरदार नुकसान झाले असून, प्रशासनाने त्वरित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी. अशी देडगाव , जेऊर, पाचुंदा, माका, कौठा, शहापूर, देवगाव व परिसरातील सर्व गावाकडून मागणी होत आहे.
जोमात आलेली पिक ,शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास या अतिवृष्टी पावसाने हिरावून घेतला आहे. तरी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
देडगाव तून बाहेर गावाला जाणारी रस्ते माका, कुकाना, कौठा , जळगाव या गावचा संपर्क तुटल्याने बाहेरगावी जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे.