संत तेरेसा चर्च हरेगाव चे प्रमुख धर्मगुरू फादर सुरेश साठे यांचे निधन. .! !

संत तेरेसा चर्च हरेगाव चे प्रमुख धर्मगुरू फादर सुरेश साठे यांचे निधन. .! !

श्रीरामपूर :-
   श्रीरामपूर शहरालगत असणारे हारेगाव या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचे पवित्र समजले जाणारे हरेगाव ची मतमाऊली हे स्थळ असून त्या ठिकाणी प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत असणारे फादर सुरेश साठे यांचे दिनांक 14/ 10 /2022 रोजी रात्री 10:40 वाजता पुणे या ठिकाणी दु:खद निधन झाले. फादर सुरेश साठे यांचा जन्म हारेगाव या ठिकाणी झाला. फादर सुरेश साठे  यांचे शिक्षण हारेगाव या ठिकाणी झाले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण बोरावके महाविद्यालय श्रीरामपुर या ठिकाणी घेतले. त्यानंतर उच्च शिक्षण डी.फार्मसी पुणे या ठिकाणी घेऊन आपल्या गरीब कुटुंबाला हातभार लावण्याचा त्यांचा माणस होता. परंतु दैवी योजना वेगळेच असल्याने " बोलावलेले पुष्कळ परंतु निवडलेले थोडकेच आहे " या बायबलचे वचनाप्रमाणे  प्रभू येशुच्या मळ्यात काम करण्यासाठी त्यांची निवड झाली. 10 मे 1997 रोजी त्यांच्या जन्मभूमी हारेगाव या ठिकाणी नाशिक धर्म प्रांताचे महागुरू बिशप थॉमस भालेराव यांच्या हस्ते त्यांची गुरुदीक्षा झाली. येथून पुढे त्यांच्या धार्मिक कार्याचा प्रवास सुरू झाला. त्यांनी नाशिक चर्च,संत मायकल चर्च माहीम मुंबई,धुळे, केंदळ,घोडेगाव ,राहाता या ठिकाणी त्यांनी प्रमुख धर्मगुरू म्हणून अनेक धार्मिक कार्या बरोबर खेडोपाड्यात त्यांनी सामाजिक कार्य देखील केले. फादर सुरेश साठे शिक्षणापासून वंचित असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यात ते अग्रेसर होते.ख्रिस्ताचे कार्य खेडोपाडी पोहोचवण्या करता त्यांनी सायकलवर प्रवास केला. धार्मिक शिक्षणाबरोबरच त्यांनी बी.एस.डब्ल्यू. मुंबई विद्यापीठातून सोशॉलॉजी मध्ये एम.ए. पूर्ण केले. नाशिक धर्म प्रांतामध्ये देखील त्यांनी युवा संचालक म्हणून पद भूषवले.त्यामुळे फादर सुरेश साठे हे सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रात नावाजलेले होते.शेवटी मत माऊली भक्ती स्थान हारेगाव यांच्या जन्मभूमीत मतमाऊलीच्या भक्तीचा प्रसार व प्रचार करण्याकरता 1जुलै 2022 रोजी त्यांची प्रमुख धर्मगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली. सन 2022 ची मतमाऊली यात्रा ही त्यांची शेवटची यात्रा ठरली. त्यांच्या जाण्याने ख्रिश्चन धर्मावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने हारेगाव व राहाता चर्च परिसरामध्ये अनेक वृद्ध व तरुण व्यक्ती रडताना दिसत होते.अनेक राजकीय ,शासकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे डोळे फादर सुरेश साठे यांना श्रद्धांजली वाहत असताना पाणावले. त्यांच्या जाण्यामुळे नाशिक,नगर, औरंगाबाद सह मुंबई परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.