अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा- मा.वि.जि.न्यायाधीश श्रीमती माधुरी एच मोरे साहेब यांची कार्यवाही
*“ अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा "*
अहमदनगर : आरोपी नामे दिलीप भगवान बडे , वय २७ वर्षे , रा . चिंचपुर पांगुळ , ता . पाथर्डी , जि . अहमदनगर याने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी मा . विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच . मोरे साहेब यांनी आरोपी दिलीप भगवान बड़े यास भा.दं. वि . का . कलम ३५४ प्रमाणे अन्वये दोषी धरून १ वर्ष सक्तमजुरी व २,000 रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद , भा.दं.वि. का . कलम ३२३ अन्वये दोषी धरून ६ महिने सक्तमजुरी १,००० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी केंद , भा.दं.वि. का . कलम ५०४ अन्वये दोषी धरून ६ महिने सक्तमजुरी १,००० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद आणि भा.दं. वि . का . कलम ५०६ अन्वये दोषी धरून ६ महिने सक्तमजुरी व १,००० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली . याप्रकरणी सरकारी वकील म्हणुन विशेष सरकारी वकील श्रीमती . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी काम पाहिले .
सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि , दि . १६ / ०६ / २०१ ९ रोजी रात्री ०८:३० चे सुमारास पिंडीत मुलगी व तिची आई या त्यांच्या घराबाहेर ओटयावर झोपलेल्या असताना आरोपी नामे दिलीप भगवान बड़े हा त्याच्या अंगावरील कपडे काढुन पिंडीत मुलींच्या घरासमोर येवुन तिच्या अंगावरील पांघरूण ओढुन तिच्या हाताला धरून तिला मिठी मारली व पिडीत मुलगी व तिव्या आईला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले . त्यावेळी पिडीत मुलीची आई मध्ये पडली असता त्याने तिला उचलुन जमीनीवर खाली आपटले . झालेल्या झटापटीत पिडीत मुलगी व तिच्या आईला किरकोळ दुखापत झाली . त्यानंतर काही वेळाने पिडीत मुलीचे वडील घरी परत आल्यावर आरोपी त्यांना म्हणाला कि , " मी तुझे बायको व पोरीकडे आलो तुला काय करायचे ते करून घे " असे म्हणुन त्यांना दगडाने डोक्यात व लाथाबुक्क्यांनी मारले . घटनेनंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी त्यांच्या गावात राहणा - या मेव्हण्याला फोन करून बोलावुन घेतले . आरोपीने त्यांनादेखील दगडाने मारहाण केली . त्यानंतर पिडीत मुलीने पाथर्डी पोलीस स्टेशनला जावुन आरोपीविरुध्द फिर्याद दिली . पिडीत मुलीच्या दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरूध्द पाथर्डी पोलीस स्टेशन येथे भा.दं. वि.कलम ३५४ , ३२४ , ५०४ व ५०६ व पोक्सो कायदा कलम ७ व ८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला . सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. जावळे यांनी करून मा . न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले .
सदर खटल्याची सुनावणी मा . विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एव मोरे साहेब यांचेसमोर झाली . वरील खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनिषा पी . केळगंद्रे -शिंदे यांनी काम पाहिले . सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण 8 साक्षीदार तपासण्यात आले . सदर खटल्यामध्ये पिडीत मुलगी पिंडीत मुलीचे आई - वडिल , जखमी नातेवाईक साक्षीदार , पंच साक्षीदार, तपासी अंमलदार , तसेच वयासंदर्भात मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या . मा.न्यायालयासमोर आलेल्या साक्षी - पुरावा तसेच विशेष सरकारी वकील मनिषा पी . केळगंद्रे शिंदे यांचा युक्तिवाद ग्राहय धरून मा . न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली .
सदर खटल्याचे सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी एलपीसी . नंदा गोडे मॅडम तसेव एलपीसी , उत्कर्षा वडते मॅडम , पाथर्डी पोलीस स्टेशनचे पो . कॉ . भिंगारदिवे यांनी विशेष सरकारी वकील मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांना मदत केली .
अहमदनगर
ता . ११/०४/२०२२
( मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे )
विशेष सरकारी वकील अहमदनगर . 9850860411