जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार .

जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार .

*जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार*

 

       जलजीवन मिशन अंतर्गत " हर घर नल,हर घर जल" योजनेतुन वैजापुर तालुक्यातील चोरवाघलगाव गावासाठी तब्बल एकविस लाख रुपये निधी मंजुर असलेले काम सुरू असुन सदरील काम हे गावातील व वाडीवस्तीवर संपुर्ण नवीन पाईपलाईन व नवीन नळ कनेक्शनची मंजुरी असतांना देखील गावातील पाईपलाईन नवीन न बनवता सिंमेट व डांबरी रस्त्याची कारणे दाखवली जात आहे .पंचवीस ते तीस वर्षापुर्वी जूनी पाईपलाईन असलेली व झाडाच्या मुळ्या जाळ्या पसरलेली व जीर्ण झालेल्या पाईपलाईनला नवीन कनेक्शन वरचेवर जोडुन सदरील ठेकेदार ग्रामपंचायत कमिटी व संबधित आधिकाऱ्यांनी मिलीभगत करुन कागदोपञी काम दाखवत शासनाने गावासाठी पुरविलेला लाखो रुपयाचां निधी भरदिवसा हडप केला जातोय .यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार की डोळे झाकुन मुकसंमती देणार ? याकडे गावाकऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे.