*नेवासा फाटा परिसरातील हॉटेल औदुंबर व हॉटेल नामगंगा येथील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा*

*नेवासा फाटा परिसरातील हॉटेल औदुंबर व हॉटेल नामगंगा येथील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा*

*पाच पीडित परप्रांतीय मुलींची सुटका व दोन आरोपी ताब्यात* 

*DySP संदीप मिटके यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई*

 (प्रतिनिधी): आज दि.25/11/2022 रोजी Dysp संदीप मिटके यांना नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली. त्यावरून नेवासा फाटा परिसरात हॉटेल औदुंबर व हॉटेल नमगंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन पाच पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे. 

  त्यानुसार आरोपी १ )विक्रम बाळासाहेब साठे वय 20 रा. जालना २) अमोल नामदेव पैठणे वय २५ रा.मुकिंदपुर यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारस प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. 

*सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI प्रताप दराडे, PI करे, Api मानिक चौधरीं, API थोरात, psi मोंढे,Asi राजेंद्र आरोळे, HC औटी,पोलीस कॉन्स्टेबल इनामदार,पाखरे, विकास साळवे ,सुहास गायकवाड ,ठोंबरे, कुदळे, गुंजाळ, करंजकर, इनामदार, Lpc उंदरे व Lpc जाधव यांनी केली.*