नगर शहरांमध्ये नागेबाबा मल्टीस्टेट यांच्यावतीने सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी उत्कृष्ट जेवणाची सोय केल्याबद्दल दिघी ग्रामस्थांच्या वतीने उतराई म्हणून केला नागेबाबा परिवाराचा सन्मान....
नेवासा दि१२
नगर शहरामध्ये नागेबाबा मल्टीस्टेट यांच्यावतीने रुग्णांसाठी सेवाभावी म्हणून जेवणाची उत्कृष्ट सोय नागेबाबा परिवाराच्या वतीने नेहमी केली जाते त्याच अनुषंगाने त्याचे उतराई म्हणून आज दिघी गावच्या ग्रामस्थांनी नागेबाबा परिवार यांचे सदस्य व सलाबतपुर नागेबाबा शाखेचे नांदे साहेब यांचा सन्मान केला.... श्री संत नागेबाबा पतसंस्थेचे वतीने असे उपक्रम नेहमीच राज्यभरात राबवले जातात त्याच अनुषंगाने नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन हे विचारधन चळवळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करताना नेहमीच दिसतात. तसेच नागेबाबा परिवाराच्या वतीने ॲम्बुलन्स सेवा रुग्णांची सेवा तसेच अनेक सामाजिक उपक्रम यामध्ये नेहमीच राबवले जातात त्याच सामाजिक उपक्रमाचा सन्मान आज दिघे गावच्या वतीने करण्यात आला... यावेळी संजय नागोडे मा. सरपंच दिघी, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव नागोडे, रंगनाथ नागोडे, भाऊसाहेब ताकवणे, सचिन नागोडे (उपसरपंच) दिघी ,दीपक मोरे (सरपंच), बबनराव नागोडे (विविध कार्यकारी सोसायटी मा.चेअरमन), किरण नागोडे,बंनसी नागोडे ,दिगंबर बर्वे, दत्तू दळवी, गोवर्धन काळे, मयूर नागोडे, संभाजी बर्वे पोपटनागोडे,आदि दिघी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.