देडगाव येथील चर्च ऑफ द नॅझरीन चा १६ वा. वर्धापन दिवस अनेक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा.

देडगाव येथील चर्च ऑफ द नॅझरीन चा १६ वा. वर्धापन दिवस अनेक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा.

नेवासा तालुक्यातील देडगाव येथील नवे देडगाव येथील चर्च ऑफ द न्याझरीन चा १६ वा वर्धापन दिन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत व पाळक ,पास्टर व देवाचे सेवक यांच्या आशीर्वादाने मोठ्या आनंदात पार पडला.

      कार्यक्रमासाठी रेव्ह. वसंत गायकवाड, रेव्ह.विनोद गंगावणे, रेव्ह रेनॉल्ट डॅनियल, रेव्ह प्रदीप निरपगार, रेव्ह. रजनीकांत गायकवाड, रेव्ह भरत सूर्यवंशी. या नामवंत पास्टर, रेव्ह. पाळक ,यांनी संजीवन सभा व कीर्तन सेवा दिली. यानंतर दररोज सायंकाळी प्रिती भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

         या कार्यक्रमास विविध बालकलाकारांनी ही सहभाग घेतला होता. तर परिसरातील अनेक चिमुरडे कलावंत येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमासाठी अनेक दात्यानी प्रीती भोजन व विशेष भेट दिली.

          यावेळी प्रभूचे नामस्मरण, प्रभूची भक्ती ,समाजातील विषमता दूर व्हावी ,समाजातील मतभेद दुर व्हावे, सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने जगावे, सर्व जाती धर्मामध्ये भाईचारा कायम राहावा, सर्व धार्मिक कुटुंबातील परिवार सुखी समाधानी जगावे, सर्वाचे दुःख कमी व्हावे.व या देशाचे कल्याण व्हावे या अनेक विषयावर प्रार्थना झाल्या.

          या कार्यक्रमासाठी मा. सभापति सुनीताताई शंकरराव गडाख यांनी भेट देत म्हणाल्या की, हा समाज अगदी मायाळू व धार्मिक

समाज आहे., हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद व अभिनंदन करण्यासारखा आहे.तसेच पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, प. स.अजित मुरकुटे, विकास राजळे, गणेश लोंढे ,माजी सरपंच जालूनाना चांदघोडे यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या.

         सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, युवा नेते निलेश कोकरे ,युवा नेते श्रीकांत हिवाळे ,भाजपचे उपाध्यक्ष आकाश चेडे , मा. योसेफ चेअरमन हिवाळे प्रगतशील बागातदार  लक्ष्मणराव चेडे,वंचित बहुजनचे बलभीम सकट, एकलव्य संघटनेचे शिवाजीराव थोरात, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, राजेंद्र ससाणे, बळिराजा संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे, बाळासाहेब मुंगसे ,राजेंद्र मुंगसे,रेव्ह .बाळू वाघमारे,चर्च ऑफ द न्याझारिनचे अध्यक्ष व सर्व सदस्य, मिड महाराष्ट्र चर्च ऑफ द न्याझारिन अहमदनगर, इम्मानुयेल पास्टर फेलोशिप शेवगाव, नेवासा फास्टर फेलोशिप, तेरे बँक मेमोरियल चर्च देडगाव, पा. एलीया हिवाळे, पा. कडुबाळ सासणे,ब्र.यश खाजेकर ,ब्र.श्रोत बनकर ,सी .प्रिया खाजेकर, मिड महाराष्ट्र प्रांत सर्व पालक व पास्टर, लव ऑफ क्रॉस चर्च देडगाव, व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोलाचे कष्ट घेतले.

       या कार्यक्रमाचे आयोजक रेव्ह. बाळासाहेब वाघमारे व चर्च ऑफ न्याझारीन चे सर्व सदस्य, दळवी परीवार, हिवाळे परीवार यांनी विशेष परिश्रम घेतले.