श्री .संत माऊली अर्बन मल्टीस्टेट देडगाव शाखेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
*श्री संत माऊली अर्बन मल्टीस्टेट देडगाव चा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.*
श्री .संत माऊली मल्टीस्टेट देडगाव ही संस्थापक चेअरमन सुनील शिरसाठ यांच्या नेतृत्वाने 365 दिवस निरंतर चालणारी परिसरातील एकमेव विश्वसनीय संस्था असून अल्पावधीतच उंच भरारी घेणारी ही संस्था ठरली आहे. या संस्थेने एका वर्षामध्ये २ कोटी पेक्षा अधिक उलाढाल केली असून ५०० हून अधिक खातेदा खाती उघडली आहेत. तर खातेदाराने आत्तापर्यंत ९० लाखाहून अधिक ठेवी ठेवल्या आहेत. विविध प्रकारची कर्ज वितरण व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. अशा अनेक सुविधा जन्य संस्थेचा वर्धापन दिन श्रीराम साधना आश्रमांचे महंत सुनीलगिरी महाराज व गाथा मूर्ती ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
वर्धापन दिन निमित्त या सोहळ्याला शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे अध्यक्ष म्हणून लाभले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन सुनील शिरसाट यांनी करत आलेल्या मान्यवरांचे स्वागत करत संस्थेला आतापर्यंत मिळालेले मानांकन पुरस्कार आतापर्यंत संस्थेने ९ शाखा उघडून यशस्वीरित्याकडे वाटचाल संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक धार्मिक विविध सामाजिक कार्य बाराही महिने पार पडत असतात .अशा अनेक सकारात्मक भूमिका साकारत खातेदाराची परिसरातील विश्वास हर्ता जपणारी एक श्री संत माऊली मल्टीस्टेट संस्था आहे . अशा अनेक विषयावर खातेदाराबरोबर संवाद साधला.


तर ह भ प सुखदेव महाराज मुंगसे व महंत सुनीलगिरी महाराज यांनी आपल्या मनोगतातुन वर्धापन दिन निमित्ताने या संस्थेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
तर या वर्धापन दिन निमित्त विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे ,खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे ,बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे , नेवासा भाजपा उपाध्यक्ष आकाश चेडे, ह भ प राजाराम महाराज मुंगसे, पावन महागणपती देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे ,विश्वस्त अशोक मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे ,ज्येष्ठ पत्रकार बन्सी एडके, भागवत दीक्षित, सतीश शेठ मुथा, बाबासाहेब तांबे, हरिभाऊ मुंगसे, पोपट मुंगसे आदी खातेदार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर हा वर्धापन दिन यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाखेचे सेवक शाखा अधिकारी अमित मुंगसे ,ऑफिसर अजित बनसोडे, कॅशियर हर्षल मुंगसे, शिराळ शाखेचे ज्ञानेश्वर पालवे यांनी अनमोल कष्ट घेत विशेष सहकार्य केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार युनूस पठाण यांनी मानले.









