नगर मनमाड हायवे वरती पुन्हा एकदा अपघात नगर मनमाड हायवे वर अपघातांचे सत्र सुरू
नगर मनमाड मार्गाने घेतला आणखी एक तरुणाचा बळी.
राहुरी शहरा लगत नगर मनमाड महामार्गावर असलम बशीर सय्यद या 31 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू.
असलम हा राहुरी फॅक्ट्री कडून राहुरी कडे येत असताना खड्डा हुकवताना अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यात असलमच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. असलम हा एक ड्रायविंग करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता एका टाटा झिप गाडीवर ड्राइव्हर म्हणून एका फळ व्यापाऱ्याकडे काम करत होता तीच गाडी घेऊन तो राहुरी फॅक्ट्री कडून राहुरी कडे येत असताना खड्डा हुकवताना अज्ञात वाहणाची त्याला धडक बसली व तो गाडीतून खाली पडुन डोक्याला जबर मार लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला घटना घडताचा घटनास्थळी खुप गर्दी झाली व रवींद्र देवीगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणला असता वैद्यकीय अधिकारी यानी तपासणी केली असता मृत घोषित करून मृतदेह शवविच्छेदनास पाठवले आहे.मयत असलम याच्या मृत्यू ने राहुरी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.असलम या मृत तरुणाचा विवाह झालेला असुन त्याच्या पश्चात एक भाऊ बहीण वडील पत्नी एक मुलगा व एक मुलगी आहे








