उर्वरीत सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे अन्यथा मंत्रालया समोर अमरण उपोषणाचा इशारा ...
राहुरी कृषी विद्यापीठा करीता तालुक्यातील ६ गावच्या ५८४ खातेदार शेतकर्यांच्या जमिनि संपादीत केल्या याला ५४ वर्षे पूर्ण झाले असून आजपर्यंत ३६२ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले ५८४ पैकी ३६२ लोक सामावून घेतलेनंतर उर्वरीत एकही प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले नाही.
याकरिता प्रकल्पग्रस्तांनी वेळोवेळी आन्दोलने. उपोषणे. केली तात्कालिन कृषी मंत्री मा.दादाजी भूषे कृषी विभागाचे कक्ष अधिकारी यांचेही भेटी घेतल्या वेळोवेळी पत्रव्यवहार केले परंतु उर्वरित प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून व विद्यापीठ प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही.
सध्या मुळ प्रकल्पग्रस्त यांची चौथी पिढी देखील वयोमर्यादेतून बाद होत चालली आहे येत्या २० दिवसात प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर आम्ही दि.०६ आक्टोबर २०२२ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ते मंत्रालय मुंबई पर्यंत चालत जाऊन न्याय मागनार आहोत आम्हाला त्या ठीकाणी न्याय मिळाला नाही तर आम्ही त्या ठीकाणी मंत्रालयासमोर अमरण उपोषण सुरु करू व त्याच्या होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र शासन व राहुरी कृषी विद्यापीठ प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील.
अशा अशयाचे निवेदन प्रकल्पग्रस्तांनी राज्याचे कृषीमंत्री मा.ना.श्री अब्दुल सत्तार महसुल मंत्री मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पा.मा.खा.श्री डॉ. सुजय विखे पा.मा.आ. श्री. प्राजक्त तनपुरे प्रधान सचिव कृषी विभाग. प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभाग.प्रधान सचिव महसूल व वन विनविभाग .प्रधान सचिव मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई.मा. जिल्हा अधिकारी अहमदनगर.मा. कुलगुरू म.फु.कृ.वि.राहुरी.मा.कुलसचिव म.फु.कृ.वि.राहुरी.मा. तहसीलदार साहेब राहुरी.मा.पो.निरिक्षक राहुरी.यांना देण्यात आले आहे.