गुणदर्शन व पारितोषक वितरण कार्यक्रमाने कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या जयंती मासाची सांगता.

गुणदर्शन व पारितोषक वितरण कार्यक्रमाने कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या जयंती मासाची सांगता.

गुणदर्शन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाने कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या जयंती मासाची सांगता.

भारत भालेराव

ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव

शेवगाव: आज रोजी शेवगाव येथील कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे संस्थापक कर्मयोगी जगन्नाथ उर्फ आबासाहेब कान्होजी काकडे यांच्या १०४ व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित जयंती माहाची सांगता विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण आणि या एक महिन्याच्या कालावधीत पार पडलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य विक्रमराव उकिर्डे यांनी आपल्या मनोगतात कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी सुरू केलेल्या कार्यामुळे खरतर आज या विद्यालयात आपण एकत्र येऊन हा जयंती उत्सव साजरा करीत आहोत शाळेने महिनाभर राबवलेल्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच जीवन संस्कार देण्याचे काम झाले आणि यासाठी संस्थेचे अध्यक्ष अँड डॉ विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदाताई काकडे यांचे परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले पाहिजेत असे मत मांडले.विद्यालयातील इ अकरावी वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु बकाल स्वाती हिने आपल्या मनोगतात आबासाहेब काकडे यांनी विस्कळीत झालेली समाजव्यवस्था शिक्षणाने सुधारेल या हेतूने शैक्षणिक,सामाजिक व राजकीय कार्य केले असे मत मांडले.

विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी आपल्या प्रास्ताविकात महिनाभर राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना शिक्षण आणि सुसंस्कार या दोन गोष्टी विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजवण्यासाठी गेले महिनाभर विविध उपक्रम राबवले गेले आणि विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमात उस्फुर्त सहभाग नोंदवून हा जयंती माह यशस्वी केला असे सांगितले.कार्यक्रम सांगता समारंभ प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

यावेळी कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजयजी चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष कैलास देशमुख यांचे सह संभाजी लांडे,देविदास गिर्हे,रज्जाकभाई शेख,भिवसेन केदार,अनंता उकिर्डे,महादेव पाटेकर,गणेश कराड,विजय पाटेकर,विजय म्हस्के,पांडुरंग गरड,अनिल नागरगोजे,पांडुरंग सांगळे,आसाराम शेळके,रघुनाथ सातपुते,नवनाथ साबळे,विश्वास वांढेकर,मोतीराम काळे,मारुती पांढरे,कल्याण जायभाये,बाळासाहेब पाटेकर,शेषराव गिऱ्हे,दिगंबर साबळे,कैलास पाटेकर,सूचित पाटेकर,मधुकर केदार,डॉ देविदास देशमुख पत्रकार दीपक खोसे,रवींद्र कणके यांचेसह पालक,विद्यार्थी, ग्रामस्थ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम पूनम वाबळे व श्रीम रत्नमाला फलके यांनी केले तर विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनीलजी जायभाये यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदान गायना

ने झाली.