माका कुकाणा रस्त्यावरील पुलाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी चे धरणे आंदोलन.
माका ते कुकाना रस्त्यावरील पुलांच्या दिरंगाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन.
मढी ते वरखेड मार्गांवरील माका ते देडगाव दरम्यानचे पूल आणि जेऊर ते कुकाणा रस्त्यावरील देवढी नदीवरील पुलाचे काम अनेक महिन्यापासून बंद आहे,
वेळोवेळी आवाज उठवून देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कृती केली गेली नाही,त्याचा निषेध म्हणून बुधवार दिनांक 31 मे रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांनी सांगितले.
15 दिवसापूर्वी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देतांना दोन दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते,पण आजपर्यंत कोठेही काम सुरु झाले नाही,पावसाळ्यात परिसरातील गावातील नागरिकांना प्रचंड त्रास या अधिकारी आणि ठेकेदाराच्या गलथान कारभाराने होणार आहे.
वेळीवेळी ग्रामस्थांची दिशाभूल करणारे प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून तात्काळ काम सुरु होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे!
या आंदोलनासाठी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाभरातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याचे अभिजित ससाणे यांनी सांगितले.