डी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल श्रीरामपूर या ठिकाणी वृक्षदिन साजरा

डी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल श्रीरामपूर या ठिकाणी वृक्षदिन साजरा

   श्रीरामपूर ::-श्रीरामपूर शहरा लगत असणाऱ्या डी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल या ठिकाणी आज रोजी वृक्षदिन साजरा करण्यात आला. वृक्षदिना निमित्त शाळेचे मॅनेजर रेव्हरंड फादर  थॉमसन यांनी सांगितले की,  निसर्ग प्रेमातून शिक्षण प्रेमाचा आनंद हा दीर्घकालीन टिकतो.  त्याच प्रमाणे मानवी जीवनात असणाऱ्या वृक्षांची गरज आणि त्यापासून मानवाला होणारे फायदे ,आणि निसर्ग व झाडे यावर अवलंबून असणारे मानवाचे जीवन यावर अनेक मोलाचे संदेश रेव्ह. फादर थॉमसन यांनी विद्यार्थ्यांना दिले. "झाडे लावा झाडे जगवा" "झाडे लावा जीवन जगवा" हे प्रमुख घोषवाक्य रेव्ह. थॉमस यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले. 
   वृक्ष दिनानिमित्त डि पॉल हायस्कूल चे मॅनेजर रेव्ह. फादर थॉमसन व शाळेतील शिक्षक सोनाली झांजरी,स्वाती घोरपडे, एथलबिल वाकडे,रवींद्र लोंढे, संदीप निबे,गणेश पवार,विकास वाघमारे,विवेक शेलार,ज्योती ब्राह्मने ,स्नेहल वानी,अनिता बोधक, सोइना भालेराव ,मोलि कुत्तुर ,विद्या लोखंडे ,वैशाली कदम ,अर्चना झरेकर ,राहुल पावसे या शिक्षकवृंदाना विद्यार्थ्यांनी वृक्षाची रोपे सप्रेम भेट देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात केले. यावेळी शाळेचे मॅनेजर रेव्ह. थॉमसन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रेव्ह.सिस्टर सेलिन यांच्या समवेत सर्व विद्याथ्र्यांनी शालेय परिसरात वृक्षारोपण केले.वृक्ष दिनानिमित्त शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.