जिल्हाधिकारी आदेशाचे राहुरी तहसीलने केले पालन,पहिलाच माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा.

जिल्हाधिकारी आदेशाचे राहुरी तहसीलने केले पालन,पहिलाच माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा.

तहसिल कार्यालय ता .राहुरी जि. अहमदनगर येथे दि . 28 सप्टेंबर हा दिवस केंद्रीय माहिती अधिकार दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला .

        

          अहमदनगर जिल्ह्यातील माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना यांच्या वतीने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये 28 सप्टेंबर हा दिवस केंद्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी संघटनेच्या वतीने तहसिल कार्यालय राहुरी येथे निवेदन देण्यात आले होते .तसेच गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी त्या त्या विभागातील पोलीस स्टेशन,तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे ईमेल द्वारे व प्रत्यक्ष जाऊन निवेदन देण्याचे काम केले होते .

      

             या सर्व निवेदनांची तात्काळ दाखल घेऊन अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री.राजेंद्र भोसले यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये 28 सप्टेंबर हा दिवस केंद्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आदेश दिले होते .यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून माहिती अधिकार दिन साजरा करावा असाही उल्लेख करण्यात आला होता .राहुरी तहसील कार्यालय यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा मान राखत आज मोठ्या उत्साहात माहिती अधिकार दिन साजरा केला .यावेळी नायब तहसीलदार श्रीमती संध्या दळवी यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले .तसेच ज्येष्ठ पत्रकार आर . आर . जाधव यांनी माहिती अधिकार कायदा व त्याचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली .

       

  या कार्यक्रमा वेळी निवासी नायब तहसिलदार मा.श्रीमती संध्या दळवी,नायब तहसिलदार श्रीमती दंडीले मॅडम,नायब तहसिलदार श्री औटी.नायब तहसिलदार श्री कानडे.श्री अविनाश ओहोळ भाऊसाहेब व तहसिल कर्मचारी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीमती यमुनाताई भालेराव.सौ धम्ममेघा आमोल जाधव.श्रीमती मायाताई पटारे,सौ.आरती प्रकाश जाधव.माहीती अधिकार पत्रकार संघटणेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री कृष्णा गायकवाड पत्रकार.अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार पत्रकार. संघटणेचे जेष्ठ मार्गदर्शक पत्रकार आर .आर .जाधव तसेच संघटणेचे कार्यकर्ते उपस्थीत होते.