डिग्रस गावातील 70 शेतकरी पी.एम . किसान सन्मान निधीपासून वंचित,तलाठ्याच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप.
डिग्रस गावातील 70 शेतकरी पी. एम . किसान सन्मान निधीपासून वंचित,तलाठ्याच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप.
राहुरी तालुक्यातील डिग्रस गावातील सुमारे 70 शेतकऱ्यांचे तलाठ्याच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान झाले आहे .हे शेतकरी दिग्रस येथील मूळचे रहिवाशी असून त्यांची शेती ही याच गावामध्ये आहे परंतु तलाठ्याच्या हलगर्जीपणामुळे या शेतकऱ्यांची नावे राहुरी तालुक्यातीलच देसवंडी गावामध्ये समाविष्ट झाली .सन 2022 मध्ये केंद्र शासनाने ई केवायसी करण्यास सांगितले त्यामध्ये या शेतकऱ्यांनी इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केली .परंतु शेती डिग्रस गावात, रहिवासी डिग्रसचे आणि नाव देशवंडी गावात येत असल्याने त्यांना मिळणाऱ्या पीएम किसान सन्मान निधीच्या तीन हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे .
सदरील शेतकरी यांनी कामगार तलाठी यांची भेट घेऊन झालेला सर्व प्रकार निदर्शनास आणून देऊनही झालेल्या प्रकाराची गांभीर्याने दखल न घेता उडवाउडवीची उत्तरे या शेतकऱ्यांना दिल्याचे समजले आहे . आजही या शेतकऱ्यांची नावे देसवंडी या गावात समाविष्ट असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे .
सदरील शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालय व तहसील कार्यालय या ठिकाणी फेऱ्या मारून कागदपत्रांची पूर्तता करूनही आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली दिसत नाही .या सन्माननिधी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तलाठी व तहसील कार्यालय यांच्यामुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे संतापाची लाट पसरली आहे .कामगार तलाठी यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नी सरळ हात वर केल्याने या शेतकऱ्यांना न्याय कोण देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे .
.