बालाजी देडगाव येथे डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण )नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे दिनांक १८ रोजी संपुर्ण जगात मानले जाणारे बोधिसत्व ,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून द्वीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. चेअरमन खंडेश्वर कोकरे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते निलेश कोकरे यांनी केले. तर सरपंच चंद्रकांत मुंगसे, गणेश मोरे, फेअर बँक चर्च चे कारभारी बाबुराव हिवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर अध्यक्ष भाषण खंडेश्वर कोकरे सर यांनी बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा सांगितली तर महामानवाचे विचाराचे आपण वारसदार आहोत, हाच विचार आपण पुढे घेऊन जाऊ .बाबासाहेब यांनी कुण्या जाती धर्माचे काम केले नाही तर संपूर्ण मानव जातीला , पशू पक्षी यांनीही संरक्षण व न्याय देण्याचे काम त्यांनी केले. या देशातील कोहिनूर चा हिरा त्यांना संबोधले गेले असे अनेक विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर विषयी मांडले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून बहुजनांचे नेते अशोकराव गायकवाड संजय नाना सुखदान, रवीभाऊ भालेराव, स्वप्निल गोरडे, अशोकराव मिसाळ, योगेश वर्मा, सुनिल कचरे, पप्पू फासे,ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक बाजीराव पाटील मुंगसे, जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके,माजी चेअरमन अरुणराव बनसोडे,युवा नेते श्रीकांत भाऊ हिवाळे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आकाश चेडे, आशिष हिवाळे, नितीन हिवाळे, विजय हिवाळे,महेश चेडे, वंचित बहुजन चे बलभीम सकट , पै. संभाजी टकले,अशोकराव जावळे, एकलव्य संघाचे जिल्हाप्रमुख प्रमोद थोरात , एकलव्य देडगावचे अध्यक्ष कृष्णा मोरे, मा. सरपंच दत्ता मुंगसे, चद्रभान कदम,सचिन हिवाळे ,सनी बर्फे, डॉक्टर प्रवीण चराटे, कांता मामा हिवाळे, प्रशांत हिवाळे, आकाश हिवाळे, विश्र्वास हिवाळे टेलर, आण्णा हिवाळे,मुस्लिम समाजाचे रज्जाकभाई पठाण, भीमराज मुंगसे, अन्वर सय्यद, सचिन गोयकर , मारुती बनसोडे , आप्पासाहेब दळवी, शाहूल हिवाळे , सचिन हिवाळे, संदिप ढवळे, अशोकराव मुंगसे, रणदिवे सर, दिलदार सय्यद,आनंद दळवी व आदी मान्यवर व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार फेअर बँक मेमोरियल चर्च चे अध्यक्ष श्रीकांत भाऊ हिवाळे यांनी मानले. या कार्यक्रमानंतर गावभर मोठ्या उत्साहात फटाक्याच्या आतषबाजी मध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिव - भीम गर्जना देऊन , नाचून या मिरवणुकीची शोभा वाढवली. मिरवणुक अतीशय शांततेत पार पडली
.