राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त - कुलगुरू डॉ. पी . जी . पाटील

राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त - कुलगुरू डॉ. पी . जी . पाटील

*राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन शेतकर्यांसाठी उपयुक्त*

*- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*

*राहुरी विद्यापीठ, दि. 26 ऑगस्ट, 2024*

            कृषि विभागातर्फे परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय भव्य राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन, पशु प्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकर्यांना मार्गदर्शक ठरतील. अशा अनेक महत्वपूर्ण उपक्रमांचे दालने कृषि महोत्सवात प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे भव्य कृषि प्रदर्शन शेतकर्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

           बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे कृषि विभागातर्फे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषि महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. या राज्यस्तरीय कृषि महोत्सवास महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की जास्तीत जास्त शेतकरी बाधंवांनी कृषि महोत्सवास भेट देवून नवनविन तंत्रज्ञान, कृषि औजारे, कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान तसेच तज्ञांच्या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकरी बाधंवांनी लाभ घ्यावा. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी कृषि महोत्सवामध्ये भरविलेल्या प्रत्येक प्रदर्शन दालनास भेट देवून माहिती घेतली. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, प्रगतशील शेतकरी कृषि पदवीधर श्री. माधवराव दहिफळे उपस्थित होते.