महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आगमन दिनाला बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर उपस्थित
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे 16 डिसेंबर 1939 रोजी बेलापूर स्टेशनला आले होते रेल्वे स्टेशनवर उतरून हरेगाव या ठिकाणी महार वतन परिषदेत उपस्थित राहिले होते त्या ऐतिहासिक दिनाला 85 वर्ष पूर्ण झाले आहे त्या दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने बेलापूर रेल्वे स्टेशन समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात आली होती त्या प्रतिमेस भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी रेल्वे स्टेशनचे स्टेशन प्रबंधक एमपी पांडे यांना रेल्वे स्टेशनवर बाबासाहेब आले होते त्याची माहिती असलेले प्रतिमा रेल्वे स्टेशनवर लावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन भारतीय बौद्ध महासभेचे गौतम पगारे सुगंधराव इंगळे सरिता सावंत यांच्या हस्ते भेट देण्यात आली त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर बेलापूर रेल्वे स्टेशनला 85 वर्षांपूर्वी आले होते आजच या ऐतिहासिक दिनी देखील बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर आल्यामुळे आम्ही श्रीरामपूरकरांचे भाग्य समजतो लवकरच भीम अनुयायांचे स्वप्न साकार होणार असून बेलापूर रेल्वे स्टेशनला लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली त्यावेळी रिपाईचे राजू गायकवाड सुनील शिरसाठ सुरेश जगताप बहुजन टायगर फोर्स चे अध्यक्ष संजय रूपटक्के विशाल सुरडकर गुड्डू पंडित रितेश एडके अशोक लोंढे वसंत साळवे गोरख आढाव सुरेश शिवलकर विश्वास भोसले वंचितचे किशोर ठोकळ प्रवीण साळवे नवनाथ गुडेकर दर्शनाताई काळे संगीताताई गायकवाड जयश्री पवार वंदनाताई गायकवाड आदी उपस्थित होते बेलापूर रेल्वे स्टेशन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने विद्युत रोषणाई करून साऊंड सिस्टिम लावून पेढे वाटून महामानवाच्या आगमन दिनाचा जल्लोष साजरा करण्यात आला