सुभाष त्रिभुवन साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित .
श्रीरामपूर ( प्रतिनिधी) कायम सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आपल्या कविताच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे त्याच पद्धतीने विविध पक्षाच्या राज्यकर्त्यांवर कविताच्या माध्यमातून आसूड ओढणारे श्रीरामपूर येथील रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष कवी सुभाष त्रिभुवन यांना लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित कवी संमेलनात झालेल्या कार्यक्रमात साहित्य भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीरामपूर येथील लोकमान्य टिळक वाचनालय येथे डॉ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमात प्रा डॉ बाबुराव उपाध्ये किशोर निर्मळ पत्रकार प्रकाश कुलथे काळूराम बोरुडे पत्रकार करण नवले लहानु खरात भाऊसाहेब धोंडगे कवी बाबासाहेब पवार या मान्यवरांच्या हस्ते कवी सुभाष त्रिभुवन यांना त्यांच्या साहित्य सेवेतील योगदानाबद्दल त्यांना साहित्य भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे