स्थानिक प्रशासनाच्या कृपेने,गोदावरी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा अमर्यादित पणे सुरु.

स्थानिक प्रशासनाच्या कृपेने,गोदावरी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा अमर्यादित पणे सुरु.

प्रतिनिधी:-वैजापूर

      गोदावरी नदीचे बॅकवॉटर कमी होताच वाळू तस्कर सरसावले. हजारो ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा केलेला आहे व सातत्याने सुरू पण आहे.

          पोलीस प्रशासन व महसूल यंत्रणा यांच्या कृपेने हा सर्व सावळागोंधळ अगदी राजरोस चालू आहे. स्थानिक पातळीवर असलेले सरकारने नेमलेले कर्मचारी पोलीस पाटील व तलाठी यांच्या संगनमताने काम चालू आहे व तलाठ्यानां दिवटी तेथे रहिवाशी असण्याच्या आदेश असतांंनाही या आदेशाला केराची टोपली दाखवत ग्रामीण भागातील तलाठी सजा कार्यालय आजही बंद अवस्थेत पडुन आहेत यामुळे तर वाळुचोरांना चांगलीच संधी मिळत आहे आणि या विषयाबद्दल तर परिसरात विविध चर्चा ऐकावयास मिळत आहे

     जसे जसे बॅक वॉटर कमी होत आहे तसतसे वाळू तस्करांना सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे . तरी सदर गोष्टीकडे जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन यांनी लक्ष देणे गरजेचे आहे शासकीय खनिजाची होणारी तस्करी ही भयानक स्वरूपाची असून त्याकडे तातडीने लक्ष न दिल्यास स्थानिक ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.