सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पात आयओटी तंत्रज्ञानावर होणारे संशोधन शेतकऱ्यांना फायदेशीर - महासंचालक श्री. रावसाहेब भागडे .

*सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पात आयओटी तंत्रज्ञानावर होणारे संशोधन शेतकर्यांना फायदेशीर*- *महासंचालक श्री. रावसाहेब भागडे*
शेतीमध्ये प्रभावी सिंचन व्यवस्थापन करण्यासाठी, विविध पिकांचे प्रत्यक्ष वेळेनुसार अचूक सिंचन वेळापत्रक ठरवण्यासाठी, पाणी वापर कार्यक्षमता सुधारणे व उत्पादनात वाढ होण्याची क्षमता आ.यो.टी. तंत्रज्ञानामध्ये आहे. यावर महात्मा फुले कृषि विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पात होत असलेले संशोधन शेतकर्यांना फायदेशीर असल्याचे प्रतिपादन कृषि परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील काटेकर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाला भेट दिल्यानंतर श्री. रावसाहेब भागडे बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. साताप्पा खरबडे, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. किशोर शिंदे, माजी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, कुलसचिव डॉ. नितीन दानवले व कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख तथा काटेकर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमुख संशोधक डॉ. सुनील कदम उपस्थित होते.
या भेटीप्रसंगी आयओटी सक्षम मृद ओलावा संवेदक आणि फुले मृदा ओलावा संवेदक आधारित सिंचन वेळापत्रक प्रणाली ,फुले स्मार्ट हवामान केंद्र,हायपरस्पेक्टरल इमेजिंगचा शेतीसाठी ड्रोन व दूरस्थपणे चालणारा फवारणी फुले रोबोट, या तंत्रज्ञानाबद्दलची माहिती डॉ. सुनील कदम यांनी दिली. या भेटीनंतर श्री. रावसाहेब भागडे यांनी कृषि किटकशास्त्र विभागातील किडनाशक अंश पृथःकरण प्रयोगशाळेल व मधुमक्षिका पालनालाही भेट देवून माहिती घेतली. या भेटीच्या वेळी डॉ. योगेश सैंदाने व डॉ. सुदर्शन लटके यांनी माहिती दिली. काटेकर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पातील इंजि. किरण पवार, इंजि. निलकंठ मोरे, संशोधन सहयोगी डॉ. शुभांगी घाडगे, डॉ. वैभव मालुंजकर, डॉ. गिरीशकुमार भणगे, इंजि. तेजश्री नवले, डॉ. आनंद बडे व इंजि. अभिषेक दातीर उपस्थित होते.