' पोक्सो न्यायालयाचा दणका : जामीनावरील आरोपीस ताब्यात घेतले , अँड मनिषा पी केळगंद्रे
अहमदनगर : कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हयातील आरोपी नामे माऊली उर्फ ज्ञानदेव बापू धायगुडे रा . राक्षसवाडी ता . कर्जत जि . अहमदनगर यांस विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच . मोरे मॅडम कोर्ट यांनी पूर्वीच्या न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली . सदर प्रकरणी विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे विशेष भूमिका बजावली . घटनेची थोडक्यात हकीगत अशी की , कोतवाली पोलीस स्टेशन येथील भा.द.वि. कलम ३७६ अंतर्गत दाखल गुन्हयातील पिडीत हीने सरकारी वकील यांचे मार्फत मा . न्यायालया यांचेकडे लेखी स्वरूपात अर्ज देवून सांगिते की , सदर गुन्हयातील आरोपी नं . १. माऊली उर्फ ज्ञानदेव बापू धायगुडे रा . राक्षसवाडी ता . कर्जत , जि . अहमदनगर हा पिडीतच्या घराजवळ रहायला आहे . आरोपी हा सातत्याने सदर गुन्हयातू जामीन मंजूर झाल्यापासून पिडीतेच्या मोबाईलवर त्याच्या मोबाईलवरून वाईट अश्लील भाषेत मेसेज करीत आहे . तसेच आरोपी हा पिडीतेस पहाटेच्या सुमारास भेटायला बोलवित होता . तसेच आरोपी पिडीतेस तिची समाजामध्ये बदनामी करीन अशी धमकी देत होता . आरोपीच्या अशा वागण्यामुळे पिडीतेच्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होत होता . आरोपी जामीनावर सुटल्यापासून सतत पिडीतेस त्रास देत होता . याबाबत पिडीत हिने मा . न्यायालयात लेखी अर्जासोबत व्हाटस्अप मेसेजची रिकन शॉटच्या कॉपीज जोडलेल्या होत्या . आलेल पिडीतेचा सरकारी वकीलांच्यामार्फत अर्ज दाखल झाल्यानंतर आरोपीचे वकीलांनी त्यावर म्हणणे मागविण्यात आले . त्यावेळी आरोपीचे वकीलांनी पिडीतेचा अर्ज खोटा तसेच सदरच्या केसची सुनावणी लांबविण्यासाठी अर्ज दिला असल्याचे म्हणणे लेखी स्वरूपात दाखल करून पिडीतेचा अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली . सदरच्या प्रकरणी सरकारी वकील यांनी युक्तीवाद केला की , पिडीत हिने अर्जासोबत दाखल केलेले मेसेजेस जर वाचून पाहिले तर आरोपीने पिडीतेस अतिशय गलिच्छ , अर्वाच्च व अशिल भाषेत मेसेजेस केलेले दिसत आहेत . त्याबरोबर आरोपी हा रात्री मध्यरात्री पिडीतेस व्हिडीओ कॉल करीत असल्याचे दिसत आहे . मेसेजवरून आरोपी पिडीतेस धमक्या देत असल्याचेही दिसत आहे . त्याचबरोबर काही मेसेजेस जर पाहिले तर आरोपी याने त्याचे स्वतःचे वकीलांविरुध्दही अतिशय घाणेरडया भाषेत पिडीतेस मेसेजेस केल्याचे दिसून येत आहे . वास्तविक पाहता , पूर्वीच्या न्यायालयाने आरोपीस जामीन देतेवेळी काही अटी घालून दिलेल्या होत्या त्या अटींचे पालन आरोपीने केले नसल्याचे मा . • न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले . तसेच आरोपीस त्याचे विरूद्ध मा . न्यायालयात गंभीर गुन्हा दाखल असलेबाबतची केस चालू आहे याबाबतचे देखील भान नाही व अशा आरोपीस जर जामीनावर तसेच खुले ठेवले तर आरोपीचे मनोधैर्य वाढेल व तो पिडीतेस त्रास देत राहिल . त्यामुळे पिडीतेचे जीवन जगणे मुश्किल होईल याचा परिणाम तिच्या वैवाहिक जीवनावर होईल असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे यांनी केला . सरकारी वकीलांचा युक्तीवाद व घटनेचे गांभीर्य पाहून मा . न्यायालयाने आरोपी माऊली उर्फ ज्ञानदेव बापु धायगुडे यांस पूर्वीच्या न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करून ताब्यात घेतले व आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली . तसेच आरोपीचा वापरता मोबाईल जप्त करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आदेश पोलीस निरीक्षक , कोतवाली पोलिस स्टेशन यांना दिलेले आहेत . अहमदनगर ता . २३/११/२०२२
( ॲड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )
विशेष सरकारी वकील , अहमदनगर .
मो . ९ ८५०८६०४११,
८२०८ ९९ ६७ ९ ५