विद्यार्थ्यांनी आयुष्यात सहकार्याची भावना जोपासावी - अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार
*विद्यार्थ्यांनी आयुष्यात सहकार्याची भावना जोपासावी*
*- अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार*
*राहुरी विद्यापीठ, दि. 20 ऑगस्ट, 2024*
महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी वरिष्ठ व कनिष्ठ वर्गातील आपल्या मित्रांबरोबर सहकार्य, प्रेमाची व मैत्रिची भावना ठेवावी व जोपासावी. यामुळे नकळत आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो व समाजात वावरण्याची कला समृध्द होते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात अँटी रॅगींग डे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार बोलत होते. याप्रसंगी कुलमंत्री तथा प्राध्यापक डॉ. विक्रम कड, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, प्राध्यापक डॉ. ममता पटवर्धन, तांत्रिक अधिकारी डॉ. सुनील फुलसावंगे, सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के उपस्थित होते.
यावेळी डॉ. विक्रम कड यांनी रॅगिंग म्हणजे काय, अँटी रॅगिंग कायदा तयार करण्यामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली व या सर्व माहितीचे पावर पॉइंटद्वारे सादरीकरण केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना अँटी रॅगींगची शपथ दिली. याप्रसंगी डॉ. कैलास कांबळे, डॉ. ममता पटवर्धन, डॉ. सुनील फुलसावंगे यांनी अँटी रॅगींग संदर्भात सादरीकरण व मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी कु. गायत्री घळसासी, कु. चैताली मोरे व श्री. उत्कर्ष खोसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. विक्रम कड यांनी केले तर आभार डॉ. दगडु पारधे यांनी मानले.