कुष्ठरोग एक सामाजिक समस्या या विषयावर पिंपरणे येथिल परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन .
*महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागामार्फत कुष्ठरोग निर्मूलन अभियान 2023 राबविले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात कुष्ठरोग एक सामाजिक समस्या या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी 1700 रुपयांची रोख पारितोषिके व महाराष्ट्र शासनाचे प्रशस्तीपत्रक मिळविले आहे.*
या स्पर्धेत *सिद्धी सुनील देशमुख हिने प्रथम क्रमांकाचे आठशे रुपयांचे पारितोषिक मिळविले. कुमारी आकांक्षा विजय कर्पे हिने 500 रुपयांचे द्वितीय आणि सिद्धार्थ राजेंद्र जानेकर व समीक्षा बाळासाहेब औताडे यांनी 400 रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून पटकावले आहे.*
*सहाय्यक संचालक डॉक्टर श्री राजेंद्र खंडागळे यांच्या मार्गदर्शनाने आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री सुरेश घोलप यांच्यावतीने जिल्हा कुष्ठरोग तंत्रज्ञ श्री आर बी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठरोग निदान प्रतिबंध व उपाय यावर माहितीपूर्ण व्याख्यान दिले होते. कुष्ठरोग संदर्भात सोप्या ,साध्या व ओघवत्या शैलीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपण स्वतः व कुटुंबातील तसेच आपल्या संपर्कातील नातेवाईक, मित्र व समाजातील अन्य व्यक्ती या सर्वांमध्ये कुष्ठरोग संदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी श्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही श्री शिंदे यांनी दिली.*
या व्याख्यानानंतर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी उस्फूर्तपणे मोठ्या उत्साहात स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतून निवडलेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
*याप्रसंगी अहमदनगर येथील अवैद्यकीय सहाय्यक श्री समीर सय्यद, पंचायत समिती संगमनेर येथील आरोग्य सेवक श्री ए आर काळे, पिंपरणे येथील आरोग्य सेवक श्री ई.बी.पवार तसेच पंचायत समितीचे आरोग्य सेवक श्री.बी.आर. फटांगरे, पत्रकार श्री सुभाष भालेराव, प्राचार्य मुकुंद डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. आर.बी.वाळे, श्री.डी.एन.घोगरे, श्रीमती के.जे.ढोमसे श्री.दत्तात्रय ठोसर, व श्री.शरद राहींज यांचे सहकार्य या उपक्रमास मिळाले. विद्यार्थ्यांनी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात आरोग्यदूत म्हणून काम करावे असे आवाहन प्राचार्य मुकुंद डांगे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये या आजाराविषयी माहिती जाणून घेण्याचे कुतूहल होते. योग्य ती माहिती मिळाल्यामुळे उपस्थित सर्वच विद्यार्थी विशेष प्रभावीत झाले होते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.बापूसाहेब देशमुख, व पदाधिकारी तसेच स्कूल कमिटी सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.*