राहुरी कृषी विद्यापीठात आवळा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.

राहुरी कृषी विद्यापीठात आवळा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने पाच दिवसीय आवळा फळ प्रक्रिया या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 23 ते 27 सप्टेंबर, 2024 या कालावधीत होणार्या या प्रशिक्षण कार्यक्रमात आवळा कॅन्डी, आवळा गर साठवण, आवळा लोणचे, आवळा सरबत, आवळा सुपारी, आवळा मुरंबा, आवळा सिरप व स्क्वॅश आणि आवळा पावडर या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त या प्रशिक्षणामध्ये आवळा प्रक्रिया व्यवसाय कसा सुरू करावा, अन्न व सुरक्षितता व मानके, कायद्याची माहिती आणि प्रक्रिया उद्योगाची नोंदणी, आवळा प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी मशिनरी व त्यांची देखभाल, आवळा पदार्थांचे पॅकेजिंग व मार्केटिंग, आवळा प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या कर्ज योजना, आवळा प्रक्रिया उद्योगातील अडचणी, त्यावरील उपाय योजना, आवळा प्रक्रिया उद्योगाचे व्यवस्थापन या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे मध्यवर्ती परिसरात सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत चालणार असून प्रवेश मर्यादा 25 आहे. या प्रशिक्षण वर्गाचे शुल्क दि. 19 सप्टेंबर, 2024 पर्यंत नोंदणी करणार्यास रुपये 4000/- असून या तारखेनंतर नोंदणी करणार्यास नोंदणी शुल्क रुपये 4500/- असे राहील. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणार्या प्रशिक्षणार्थींनी त्यांचे शुल्क लेखा व अधिदान अधिकारी, मफुकृवि, राहुरी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँक खाते क्रमांक 38817479754 IFSC code SBIN0003239 यावर शुल्क जमा करावे व त्याचा स्क्रीन शॉट कार्यालयाचे प्रतिनिधी श्री. राहुल घुगे मोबाईल नंबर 9421437698 यांच्या मोबाईलवर पाठवावे असे आवाहन अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड यांनी केले आहे.