कृषि महाविद्यालय सोनई येथे राष्ट्रीय खेळ दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

कृषि महाविद्यालय सोनई येथे राष्ट्रीय खेळ दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

कृषि महाविद्यालय, सोनईत राष्ट्रीय खेळ दिवस साजरा

बालाजी देडगाव( प्रतिनीधी

)- मुळा एज्युकेशनच्या कृषि महाविद्यालय, सोनईत राष्ट्रीय खेळ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.संदिप तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सुनिल बोरुडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच सर्व खेळातील साहित्याचे पूजन करण्यात आले. त्यांनी याप्रसंगी राष्ट्रीय खेळ दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संपूर्ण क्रीडा खोलीची सजावट केली होती. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेसमोर सर्व खेळातील साहित्य तसेच ऑलम्पिक खेळाचे बोधचिन्ह देखील काढण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संदिप तांबे यांनी केले तर बास्केटबॉल खेळाडू प्रथमेश काटे याने आभार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले.