*बळेवाडी येथे १ मे महाराष्ट्र दिना निमित्त आजी-माजी सैनिकांचा सत्कार समारंभ अति उत्साहात साजरा.*

*बळेवाडी  येथे  १ मे  महाराष्ट्र  दिना  निमित्त   आजी-माजी  सैनिकांचा  सत्कार  समारंभ  अति  उत्साहात  साजरा.*

बिपिएस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

बळेवाडी (ता.बार्शी)     बळेवाडी येथे दि.०१-०५-२०२२ रोजी

महाराष्ट्र दिन म्हणजेच कामगार दिन म्हणून अतिशय उत्साहात

साजरा करण्यात आला. या १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून

गावातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात

आले. तसेच ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषद शाळा बळेवाडी येथे

१ली ते ४थी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगान गाऊन व प्रतिज्ञा

घेऊन जयजयकार केला. सोलापूर जि.प.चे मुख्य

कार्यकारी अधिकारी श्री दिलीप माने साहेब यांच्या प्रेरणेने आजी-

माजी सैनिकांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा

करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ सुभेदार सैनिक

श्री दत्तात्रय मोरे, सुभाष मोरे, बबन पोकळे, गोवर्धन पाटील, जगन्नाथ

पोकळे, शशिकांत मोरे, नागेश मोरे, भगवान पोकळे, जगन्नाथ मोरे,

चंद्रकांत मोरे, अरुण ढावारे, वैजनाथ पोकळे, विक्रम मोरे, प्रकाश

मोरे, प्रभावती पोकळे, संगीता पोकळे हे होते.

या कार्यक्रमात प्रमुख म्हणून

बार्शी तालुका पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण जाधव साहेब व

पो.ह.श्री हर्षवर्धन वाघमोडे साहेब.    तसेच कार्यक्रमाचे

सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री आनंद कायते सर यांनी

केले.

बळेवाडी चे सरपंच- करण मोरे,  ग्रामसेविका घोळवे मॅडम,  शिक्षिका मगर मॅडम,  अंगणवाडी सेविका मोरे मॅडम,  मदतनीस  कमल सगरे मॅडम,  रवी पोकळे,  समाधान पाटील,  गुरुनाथ मोरे, आप्पासाहेब सगरे,  हनुमंत रेडके,  नामदेव पोकळे,  अर्जुन पोकळे,  महादेव साळुंखे,  प्रल्हाद पाटील,

पुंडलीक पोकळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या गावातून २० ते २२ सैनिकांचा सत्कार मोठ्या थाटामाटात करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी तालुका संपर्क प्रमुख- सम्मेद तरटे यांनी पार पाडले.