*जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना; यंदाच्या वर्षी पाऊस जास्त होण्याची शक्यता, नियोजन बद्ध आराखडा तयार करावा -आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक*

*जिल्हा  अधिकारी  मिलिंद  शंभरकर  यांच्या  सूचना;  यंदाच्या  वर्षी  पाऊस  जास्त  होण्याची  शक्यता,  नियोजन  बद्ध  आराखडा  तयार  करावा -आपत्ती  व्यवस्थापन  प्राधिकरणाची  बैठक*

बी पी एस राष्ट्रीय न्यूज सोलापूर

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

सोलापूर.          सोलापूर जिल्हा अधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांनी पावसाळापूर्व नियोजन आराखड्याची बैठक घेतली कारण हवामान खात्याच्या अंदाजानुसार ह्यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे.

तत्पूर्वी इतर गावांना नदीकाठच्या गावांना उजनी धरणाच्या साईडच्या गावांना जास्त प्रमाणात धोका होऊ नये याकरिता त्याचा आराखडाचे नियोजन करण्यात यावे यासदर्भात अधिकाऱ्यांना माहिती दिली. मनुष्यहानी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने लोकापर्यंत संदेश तात्काळ पोचवावा, आपत्ती घडण्यापूर्वी सर्व संबंधित नियोजन भवन येथे आयोजित जिल्हाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर बोलत होते. बैठकीला निवासी जिल्हा उपअधिकारी शमा पवार, पुनर्वसन चे जिल्हाउपाधीकारी सुनील टोम्पे, प्रांत अधिकारी ज्योती कदम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह सर्व तहसीलदार पोलिस प्रतिनिधी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले की, आपत्ती अचानक पूर्व येत असते त्यामुळे त्याची पूर्वतयारी करावी. शहरामध्ये विविध प्रकारची कामे चालू असतात त्याची पाहणी करून आवश्यकतेनुसार त्याची उपाययोजना करावी. आपत्तीसाठी अचानक वाहन लागल्यास सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. प्रत्येक तालुक्याने एक एक वाहने उपलब्ध करून द्यावी. नगरपालिकेच्या ठिकाणी फायर ब्रिगेड ची सोय करण्याची सूचना श्री शंभरकर यांनी दिल्या. धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे व्यवस्थापन पूरपरिस्थिती बाबत आवश्यकतेनुसार सूक्ष्म नियोजन करावे. नदी काठावरील 623 गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यासोबत त्या गावातील एक व्यक्ती संपर्क सोबत राहण्याची आवश्यकता आहे आपत्ती आल्यास त्याचे नियोजन लवकरात लवकर करावे असेही श्री शंभरकर म्हणाले.

महावितरण, पोलीस, आरोग्य या बरोबरच सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे. वेळोवेळी आपत्तीची माहिती देण्यात यावी. नदीकाठच्या गावांना धोका कमी होऊ शकतो त्याच्यावर त्वरित उपाययोजना करता येईल सर्व आवश्यक साधने औषधे, अत्यावश्यक सामग्री वेळेतच खरेदी करून ठेवावी जेणेकरून अचानक आपत्ती आल्यास अडचण येणार नाही असेही जिल्हाधिकारी श्री शंभरकर म्हणाले आणि सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आदेश देण्यात आले.