आज राहुरी न्यायालयात योग दिनानिमित्त अतिशय उत्साहवर्धक वातावरणात योगा शिबिर संपन्न झाले
आज राहुरी न्यायालयात योग दिनानिमित्त अतिशय उत्साहवर्धक वातावरणात योगा शिबिर संपन्न झाले त्याप्रसंगी योगा टीचर सौ मंजिरी रिसबूड यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योगाचे महत्व सांगून विविध प्रकारचे योगासने करून घेतले त्यामध्ये राहुरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर मॅडम सह न्यायाधीश श्रीमती आर. एस. तापडिया मॅडम यांच्यासह राहुरी वकील संघाचे सदस्य मोठ्या प्रमाणात हजर होते तसेच राहुरी न्यायालयातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता योगासने झाल्यानंतर सामुदायिक आरोग्यासाठी प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली योगा टीचर यांचे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर मॅडम यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व शेवटी न्यायालयाचे सह. न्यायाधीश श्रीमती आर एस तापडिया मॅडम यांनी योगा टीचर व उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित राहुरी विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा राहुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती. असावरी वाडकर मॅडम, सह. न्यायाधीश श्रीमती. आर.एस.तापडिया मॅडम ,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राहुल शेटे तसेच राहुरी तालुका वकील संघाचे मा.उपाध्यक्ष व राहुरी तालुका विधी सेवा समितीचे पॅनल लॉयर्स व रिटेनर लॉयर्स ॲड. मच्छिंद्र देशमुख,वकील संघाचे सह. सेक्रेटरी ॲड.चंद्रशेखर शेळके, ॲड.कल्याणी पागिरे, ॲड.भास्कर शिरसाट ॲड.नामदेव बाचकर ॲड.अशोक किनकर ॲड. गोविंद तनपुरे,ॲड. नानासाहेब तनपुरे ,ॲड. पल्लवी कांबळे,ॲड.अनिता तोडमल ,ॲड. रवींद्र गागरे आदी सर्वजण उपस्थित होते.