अहिल्यानगर ता.पारनेर येथील तहसिलचा अव्वल कारकून लाच घेतांना रंगेहात पकडला.
▶️ *युनिट -*अहिल्यानगर.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-38 वर्षे
▶️ *आलोसे-*1) सुनिल बाबुराव फापाळे, अव्वल कारकून, तहसील कार्यालय, पारनेर, जि. अहिल्यानगर रा. बेट वस्ती, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर
▶️ *लाचेची मागणी-*
5, 50,000/- रुपये तडजोडीअंती 4,00,000/- रुपये
▶️ **लाच स्विकारली* -*निरंक
▶️ *हस्तगत रक्कम-* निरंक
▶️ **लालेची मागणी** दि.15/10/2024
▶️ *लाच स्वीकारली* निरंक
▶️ *लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांचे गावातील 11 रस्ता काँकरीटीकरण कामाचा ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. सदर कामाचे ठराव कागदपत्रासाह मा. तहसीलदार तथा गट कार्यक्रम अधिकारी म. ग्रा. रो. ह. यो. पारनेर यांना सादर केले होते. त्यानंतर मा. तहसीलदार पारनेर यांनी सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून व तांत्रिक मान्यता देणेकारिता उप अभियंता, जि. प. सा.बां. उप विभाग, पारनेर यांना पत्र दिले होते. त्यावरून उप अभियंता, जि. प. सा.बां. उप विभाग, पारनेर यांनी सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून व तांत्रिक मान्यता देऊन प्रशासकीय मान्यता करिता मा. तहसीलदार पारनेर यांना सादर केले होते. 11 कामाची प्रशासकीय मान्यता देणेकरिता सदर कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या तीन टक्के प्रमाणे रक्कमेची लाच मागणी केले बाबतची तक्रार दि. 15/10/2024 रोजी ला. प्र. वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार दि. 15/10/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचे गावातील 11 रस्ता काँक्रीटकरण कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या दोन टक्के प्रमाणे स्वतः करिता व तहसीलदार यांचे करिता 5,50,000/-₹. लाच मागणी करून तडजोडीअंती 4,00,000/-₹ लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुद्ध पारनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ *हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे* .
▶️ **सापळा व तपास अधिकारी*
श्री.अजित त्रिपुटे ,
पोलिस उप अधीक्षक , ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.8329701344
▶️ *सापळा पथक* पोहेकॉ संतोष शिंदे, मपोहेकॉ राधा खेमनर, पोना चंद्रकांत काळे, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चापोहेकॉ हारून शेख
▶️ **मार्गदर्शक* -
*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा. जिल्हाधिकारी,अहिल्यानगर
-----------------------------
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,अहिल्यानगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*