सोनई परिसरात आठ दिवसापासून बिबट्याची दहशत नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट

सोनई परिसरात आठ दिवसापासून बिबट्याची दहशत नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट

सोनई परिसरात आठ दिवसापासून बिबट्याची दहशत नागरिकांमध्ये प्रचंड घबराहट 

खेडले परमानंद वार्ताहर/दि 28 सोनई परिसरात बिबट्याचा मुक्त संचार गेल्या आठ दिवसापासून सोनई परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .

     मुळा कारखाना परिसर तिरमल वस्ती, शनिशिंगणापूर, हनुमान वाडी या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने वाड्या वस्तीवरील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे .

बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतातील कामे  रखडले आहेत या भागात ऊस , कपाशी व अनेक पिके मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे बिबट्या या पिकाचे लपन आहे व रात्रीच्या वेळी मुक्तपणे संचार करत आहे .

शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक वेळा बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे पालकांना सोबत घेऊन शाळेपर्यंत जावे लागते.

    दोन दिवसात या भागातील अनेक शेळ्या कुत्रे यांचा फडशा पाडल्याने बिबट्या विषयी नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाले आहे .

बिबट्याची संख्या  एकापेक्षा अधिक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून काही दिवसांपूर्वी खोसेवस्ती झिने वस्तीवरील कुत्र्यांना बिबट्याने ठार मारल्याची घटना घडली आहे .

      जंगलातील बिबट्या मुक्तपणे वाडी वस्ती शेती व राणावनात दिसत असल्याने वाड्या वस्तीवर त्यावरील लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे वन विभागाने याची दखल घेऊन या भागात बिबट्यांना जेर बंद करण्यासाठी ठिक ठिकाणी पिंजरे लावावे. .