संत फ्रान्सिस झेवियर व पवित्र मारिया माता यात्रा मोहोत्सव मोठ्या भक्ती भावाने व आनंदी वातावरणात साजरा.
टिळकनगर :-दि.०१/१२/२०२४ संत फ्रान्सिस झेवियर व आरोग्यदायी माता पवित्र मारियेचा 49 वा यात्रा महोत्सव मोठ्या भक्ती भावाने,शांततेत व आनंदाने टिळकनगर धर्मग्रामात साजरा करण्यात आला, प्नथम पवित्र मरिया प्रतमेची मिरवणूक दत्तनगर येथील चर्च मधून सालाबादप्रमाणे काढण्यात आली. नासिक धर्मप्रांताचे महागुरू स्वामी रा.रे.बिशप बार्थोल बॅरेटो हे या़ यात्रेच्या पवित्र मिस्सा बलिदानाचे मुख्य याजक व प्रवचनकार होते. विविध धर्मग्रामातून जवळपास १८ धर्मगुरु व धर्मभगिनी यांची उपस्थिती लाभली, पवित्र मिस्सा संपल्यानंतर सर्व भाविकांनी प्रिती भोजनाचा आस्वाद घेतला. उपस्थित सर्व धर्मगुरू, धर्म भगिनी तसेच भाविकांचे व ज्या भाविकांनी या यात्रेसाठी विषेश मदत केली त्यांचा धर्मग्रामाच्यी वतीने आभार मानण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने यात्रा महोत्सव यशस्वी झाला, देवाला धन्यवाद देत रेव्ह फा पिटर डिसोझा यांनी गायन वृंदांचे, सर्व सिस्टर्स तसेच सर्व धार्मिक गृप, संघटना यांचेही आभार मानले.या यात्रेचे सर्व नियोजन रेव्ह फा पिटर डिसोझा व सहाय्यक धर्मगुरू रेव्ह फा जाधव व रेव्ह फा संजय यांनी उत्कृष्ट प्रकारे केल्या बद्दल नाशिक धर्मप्रांताचे बिशोप स्वामी यांनी तीघांचेही पुष्पगुच्छ व शॉल श्रीफळ देवून सन्मानित केले.