रस्त्यात अडून मारहाण करत गळ्यातील चैन चोरी प्रकरणी सात जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .
रस्त्यात अडवून मारहाण करत गळ्यातील चैन चोरी प्रकरणी सात जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
दि. २० फ्रेबुरवारी रोजी भर दुपारी २ वाजेच्या सुमारास मारहाण करत लुटमार केल्याची घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार सोनई येथील पुरातण असलेल्या महादेव मंदिर रस्त्यावर भर दुपारी अडवून लांडेवाडी येथील नामदेव अशोक कोरडे व त्याचे मित्र स्वतः च्या दुचाकीवरून जात असताना आरोपी वैभव वाघ, सचिन पवार, सचिन वैरागर, अभिषेक त्रिभुवन, गणेश वैरागर, बापु वैरागर, दादासाहेब शंकर वैरागर सर्व राहणार सोनई यांनी फिर्यादी व त्यांचे मित्र यांना अडवून हातातील तलवार, लोखंडी राॅड, गलवर अशा हत्याराने जबर मारहाण करत फिर्यादी च्या गळ्यातील दिड तोळ्याची चैन ओरबाडून फरार झाले .
भर दिवसा सोनई मध्ये रस्ता लुटीचा प्रकार घडल्याने या ठिकाणी येणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. २६ रोजी फिर्यादी यांनी नगर येथील दवाखान्यात दिलेल्या जबाबा वरुन आरोपी विरुद्ध गुरन. ८०/२०२४ भाद. वि कलम ३०७,३२६,३२४,३२३,३४१,३२७,१०९,५०६,१४३,१४७,१४९,सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे पोसई सुरज मेढे हे करत आहेत.