जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे झाडांचा वाढदिवस साजरा करून केला 78 वा स्वातंत्र्य दिन.
*वृक्षांचा वाढदिवस साजरा करून केंद्रा शाळा देडगाव ने केला ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा.*
(देडगाव प्रतिनिधी युनूस पठाण)
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ७८वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. गावभर प्रभात फेरी काढत जय जवान जय किसान, भारत माता की जय या जय घोषणे गाव दुमदुमून गेले होते . सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही केंद्र शाळा देडगाव मध्ये गावच्या मान्यवर मंडळीच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी लावलेल्या शंभर विविध देशी झाडांचा वाढदिवस वृक्षासमोर केक कापून साजरा करण्यात आला.
देडगावचे दानशूर भूमिपुत्र राजेंद्र लाड साहेब यांनी वड, पिंपळ ,कडूनिंब ,चिंच ,अशोका अशी शंभर देशी झाडे बथूवेल हिवाळे आणि सतीश भोसले यांच्या मदतीने शालेय आवारात लावण्यासाठी पुढाकार घेतला होता. या झाडाचे संरक्षण करण्यासाठी माजी विद्यार्थी संघ देडगाव बॅच २००३ यांनी प्रत्येक झाडाला जाळ्या बनवूनही दिल्या होत्या. सर्व झाडे स्वातंत्र्य दिनी गावचे सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे ,शिक्षणभूषण बाजीराव पाटील मुंगसे, कारभारी पाटील चेडे, शालेय व्यवस्थापन समितीचे तत्कालीन अध्यक्ष सोपान भाऊ मुंगसे ,उद्योजक दिलदार सय्यद, पत्रकार इनुस पठाण ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके , मुख्याध्यापक सतीश भोसले व सहकारी यांच्या हस्ते वृक्षाचे रोपण करण्यात आले होते.
यावर्षीचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना उपस्थित मान्यवरांच्या नजरेत झाडांनी गजबजलेला परिसर भरला .गावच्या गणपती मंदिर परिसरात जय हिंद फाउंडेशनने देखील वृक्ष लागवड करून झाडाचा वाढदिवस साजरा केल्याची चर्चा झाली .तेव्हा गावच्या शाळेतील झाडांचा वाढदिवस करण्याची कल्पना विद्यमान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत भाऊ ससाने यांनी मांडली आणि केक आणून सर्व झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी गावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी "झाडे लावणारे वीर आहेत तर झाडे जगवणारे महावीर आहेत" असे गौरव उद्गार काढले
यावेळी स्नेहल नितीन हिवाळे या विद्यार्थिनींचाही वाढदिवस मुलांना वही पेन वाटून साजरा केला गेला तर तिसगाव अर्बन पतसंस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना ब्रॅण्डेड स्कूल बॅग आणि शालेय विद्यार्थी वक्त्यांना ट्रॉफीचे वितरणही करण्यात आले
या कार्यक्रमाच्या वेळी आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत दत्तात्रय धामणे कविता करांडे सुवर्णा जाधव अश्विनी कदम यांसह गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम प्रगतशील शेतकरी बन्सी पाटील मुंगसे , देडगाव मंडल अधिकारी सुनील खंडागळे, तलाठी बालाजी मलदोडे, उपसरपंच महादेव पुंड ,चेअरमन बाबासाहेब मुंगसे बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, निवृत्ती मुंगसे ,संजय मुंगसे,युवा नेते निलेश कोकरे, नागेबाबा संस्थेचे पांडुरंग एडके, राज पतसंस्थेचे चेअरमन संतोष टांगळ, दत्ता पाटील मुंगसे, बळीराज्य संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे, शरद हिवाळे, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
दानीयल हिवाळे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या गोड स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.