जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगसे वस्ती ( लाल गेट) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगसे वस्ती शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
ता. २६
नेवासा तालुक्यातील देडगाव गावातील मुंगसेवस्ती शाळेत ७४ वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी मा. मुख्याध्यापक श्री.रविराज चौरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य श्री. दादासाहेब एडके, भारतीय सैन्य दलात निवड झालेला राजेंद्र पटारे व शाळेसाठी भुमिदान करणारे श्री. सुंदरदास मुंगसे यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर लहान मुलांचे भाषणे आणि कविता गीत व गायन यांनी कार्यक्रमाचे विशेष लक्ष वेधून घेतले. या छोट्या चिमुरड्यांवर सर्वांनी कौतुकाची थाप टाकली.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सुभाष मुंगसे, श्री. भाऊसाहेब मुंगसे, श्री. पांडुरंग मुंगसे, श्री. सुंदरदास मुंगसे, श्री. अशोक मुंगसे, श्री. मोहन तात्या मुंगसे, श्री.राजेंद्र मुंगसे, श्री.विठ्ठल मुंगसे, श्री. बाळासाहेब मुंगसे, श्री. राजेंद्र मुंगसे, श्री. गणेश मुंगसे, श्री. आप्पा ससे, श्री. बंडू मुंगसे, श्री. संजय मुंगसे, श्री. अमोल सोनवणे, श्री. अशोक सोनवणे, श्री. शिवाजी मुंगसे, श्री. गोरक्षनाथ मुंगसे, श्री. चांगदेव मुंगसे, श्री.संदीप हिवाळे, श्री. नितिन हिवाळे, श्री. डेनिस हिवाळे, श्री. सत्यादान हिवाळे, श्री. भागवत टाके, श्री.सुरेश टाके, श्री. पांडुरंग एडके, श्री.किशोर बताडे, श्री. शंकर बताडे, श्री. गोपीनाथ कुसळकर, सर्व लालगेट मित्र मंडळ, माता भगिनी आणि अंगणवाडी ताई तारा कुटे मॅडम आणि सेविका शितल मुंगसे, समाबाई मुंगसे उपस्थित होते.
या कार्यक्रमास श्री. भाऊसाहेब चंदन सर यांनी प्रास्ताविक भाषण केले. उपस्थित सर्वांचे मुख्याध्यापक चौरे सर यांनी आभार मानले.