खेडले परमानंद येथील शिव भारतकार कवी परमानंद यांच्या मठात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा .

खेडले परमानंद येथील शिव भारतकार कवी परमानंद यांच्या मठात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा .
ज्या देवामुळे आज देव देवळात आहेत त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींची 19 फेब्रुवारी ही शिवजयंती आज नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी झाली .विश्वाला 19 फेब्रुवारी ही शिवजन्माची तारीख ज्या ग्रंथातून कळाली तो शिव भारत ग्रंथ नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद या ठिकाणी कवी परमानंद यांनी लिहिला .
आज शिवजयंती याच पावनभूमीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व खेडले परमानंद ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या थाटामाटात साजरी झाली .महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातून शिवछत्रपतींची आरती करून मिरवणूक खेडले परमानंद गावातून कवी परमानंद यांच्या मठाकडे निघाली मिरवणुकी दरम्यान सनई चौघड्या च्या तालात लेझीम पथक थिरकत होते .महाराष्ट्रीयन साज केलेल्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या मुलींचे तालबद्ध लेझीम पथक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला .
छत्रपती शिवरायांच्या व परमानंद बाबांच्या नामाचा जयघोष करीत अवघी खेडले परमानंद नगरी दुमदुमून निघाली.मिरवणूक ज्या मार्गे निघाली तो मार्ग सडा रांगोळ्यांनी फुलून निघाला होता.अगदी लहान थोर बालकांसह माता-भगिनी ,युवक वर्ग व ज्येष्ठ मंडळी कार्यक्रमात मोठ्या संख्येने महाराष्ट्रीयन वेशभूषा करून थाटात सहभागी झाली होते.
या कार्यक्रमाला महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक ढाले सर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद या शाळेच्या मुख्याध्यापक आव्हाड मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर ,भाऊसाहेब मोकाशी, नयुम भाई इनामदार,आलू भाई इनामदार ,पोपट नाना राजळे, सुरेश राजळे ,गोरक्षनाथ राजळे,शिवाजी राजळे,दौलतराव तुवर,शांतीलाल राऊत,आप्पासाहेब राजळे ,राजाबाप्पू शिंदे ,उपसरपंच जावेद भाई इनामदार, गणपत गोसावी शिवाजी जाधव ,मुनिर इनामदार दादासाहेब रोठे ,बाळासाहेब आंबिलवादे ,ठेकेदार अशोक शिंदे, युवराज बर्डे आदिं सह अनेक महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नियोजनात दोन्ही शाळेचे शिक्षक संतोष निमसे सर सविता दरंदले मॅडम जाधव एस बी सर, दीपक गडाख सर, सुभाष जाधव सर, घनश्याम राजदेव सर, प्रसाद कानडे सर, श्रीमती अश्विनी जाधव, प्रियंका तुवर, मच्छिंद्र होन, ज्ञानदेव तुवर, तुषार धाडगे, प्राथमिक शाळेचे निमसे सर व विद्यार्थी, विद्यार्थिनी,त्याचप्रमाणे योगेश वैरागर , कृष्णा राऊत , बाळा ब्राम्हणे , राहूल भुजबळे , गणेश शिंदे चैतन्य शिंदे , अनिकेत बर्डे प्रविण बर्डे यांनी महत्वाची भुमीका बजावली . अद्वितीय अविस्मरणीय अशा सोहळ्यामुळे अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले .छत्रपती शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत गौरवशाली इतिहासाची साक्ष देत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला .